डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर फेरीवालामुक्त न झाल्यास आंदोलनाचा इशारा!

तातडीने कारवाई करून डोंबिवलीकरांना दिलासा द्यावा -भाजपा नगरसेविका रंजना पेणकर

    28-Oct-2026

Dombivli Station Hawker-Free
 
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने रेल्वे स्थानक परिसरात ना-फेरीवाला क्षेत्र घोषित करूनही डोंबिवली पूर्व स्थानक परिसरातील फेरीवाल्यांची मुजोरी कायम असल्याचे चित्र आहे. गेल्या आठ महिन्यांपासून या विरोधात सातत्याने पाठपुरावा करूनही परिस्थिती बदललेली नाही. नागरिकांची होणारी कोंडी आणि त्रास लक्षात घेता, स्थानिक नगरसेविका रंजना पेणकर यांनी पालिका प्रशासनाला धारेवर धरत तातडीने ठोस कारवाई करण्याची मागणी केली आहे. (Dombivli Station Hawker-Free)
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील सद्यस्थिती दर्शविणारे फोटो, व्हिडिओ तसेच विविध दिवस आणि वेगवेगळ्या वेळांमधील परिस्थितीची माहिती संकलित करण्यात आली आहे. या माध्यमातून परिसरातील वस्तुस्थिती प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन नियमित कारवाई, प्रभावी देखरेख आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी पेणकर यांनी केली आहे.  (Dombivli Station Hawker-Free)
रंजना पेणकर यांनी सांगितले, “डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसर फेरीवालामुक्त राहणे आणि नागरिकांना सुरक्षित, मोकळा व अडथळामुक्त मार्ग उपलब्ध होणे आवश्यक आहे. यासाठी मी नियमितपणे प्रत्यक्ष पाहणी करणार असून, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून परिसरातील वस्तुस्थिती नागरिकांसमोर आणि प्रशासनासमोर मांडणार आहे,” तसेच प्रशासनाकडून ठोस आणि कायमस्वरूपी कार्यवाही न झाल्यास नागरिकांना सोबत घेऊन, विशेषतः महिलांच्या मोठ्या सहभागातून, तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.  (Dombivli Station Hawker-Free)
या प्रश्नावर संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात येणार असून, प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून डोंबिवलीकर नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी भाजपा नगरसेविका रंजना पेणकर यांनी केली आहे.  (Dombivli Station Hawker-Free)
 




संबंधित मजकूर