
मुंबई - Tiger Shroff Jackie Shroffमुंबईच्या जुहू परिसरात तीन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्यानंतर टायगर श्रॉफवर हल्ला झाला. मुंबई पोलिसांनी असेही सांगितले की, टायगरच्या गाडीवर सात गोळ्या झाडण्यात आल्या. या धक्कादायक घटनेमुळे अभिनेता टायगरचे चाहते आणि हितचिंतक चिंतेत आहेत. सुदैवाने, तो सुखरूप बचावला. आता, या गोळीबाराच्या घटनेनंतर टायगरचे वडील जॅकी श्रॉफ यांच्या टीमने आपले पहिले निवेदन जारी केले आहे. टीमने गोळीबारानंतर टायगर श्रॉफच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे.
टायगर श्रॉफच्या प्रकृतीबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, जॅकीच्या टीमने चाहत्यांच्या चिंता दूर केल्या आणि अभिनेत्याच्या प्रकृतीबद्दल माहिती देताना सांगितले, "टायगर ठीक आहे. खूप खूप धन्यवाद."Tiger Shroff Jackie Shroff
ही घटना पुष्पा पार्कजवळ घडली, जे जुहू पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गोळीबारात बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफचा ड्रायव्हर आणि एक वाटसरू जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ड्रायव्हर जखमी झाल्यानंतर टायगर श्रॉफने ड्रायव्हरची जागा घेतली आणि गाडी घेऊन निघून गेला. डीसीपी मोहित गर्ग यांनी अभिनेता सुरक्षित असून त्याला गोळी लागलेली नाही, याची पुष्टी केली आहे.Tiger Shroff Jackie Shroff
मुंबई पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी मोठी शोधमोहीम सुरू केली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी पंधरा विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी सांताक्रूझ परिसरातून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे.Tiger Shroff Jackie Shroff