कल्याण (Women Financial Independence): घर आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळतानाच महिलांनी स्वतःचे आर्थिक स्वातंत्र्य निर्माण करण्याचे आवाहन भाजप नगरसेविका हेमलता नरेंद्र पवार यांनी केले आहे.
महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने नरेंद्र पवार फाउंडेशन आणि सहकार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आयोजित विशेष गृहउद्योग उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पवार बोलत होत्या. या उपक्रमाला महिला वर्गाकडून मोठा प्रतिसाद मिळाला. भाजप नगरसेविका हेमलता नरेंद्र पवार यांच्या संकल्पनेतून झालेल्या या उपक्रमातून गृहउद्योगासाठी महिलांना मोफत प्रशिक्षण, घरपोच कच्चा माल तसेच तयार उत्पादनांच्या विक्रीसाठी सहकार भारतीच्या माध्यमातून मार्गदर्शन आणि सहकार्य मिळणार आहे. महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून स्वतःचा गृहउद्योग सुरू करून स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि कुटुंबाच्या आर्थिक उत्पन्नात हातभार लावावा या उद्देशाने या उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे. महिलांना केवळ प्रशिक्षण देण्याऐवजी उद्योगासाठी लागणारा कच्चा माल, उत्पादनांची विक्री, भांडवल आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आल्याची माहिती नगरसेविका हेमलता नरेंद्र पवार यांनी दिली. यामध्ये एसएचजी महाराष्ट्र प्रदेश सहप्रमुख सहकार भारती जया आलिमचंदानी, एसएचजी राष्ट्रीय प्रमुख सहकार भारती मधुबाला साबू, राष्ट्रीय सहप्रमुख एसएचजी सहकार भारती तुषार श्रीवास्तव, राष्ट्रीय प्रशिक्षक लखनऊ अनुराधा श्रीवास्तव यांनी उपस्थित महिलांना अतिशय मोलाचे असे मार्गदर्शन केले.(Women Financial Independence)
तर मोफत प्रशिक्षणापासून उत्पादन विक्रीपर्यंत मार्गदर्शन
उपक्रमांतर्गत महिला बचत गटांना गृहउद्योगासंदर्भात मोफत प्रशिक्षण देण्यात आले. तसेच उद्योगासाठी आवश्यक कच्चा माल उपलब्ध करून देणे आणि तयार उत्पादनांच्या विक्रीसाठी सहकार भारतीच्या माध्यमातून मार्गदर्शन व सहकार्य करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. बचत गटाने स्वतःचे भांडवल गुंतवून उद्योग सुरू केल्यास, गटाच्या गुंतवणुकीनुसार मिळणाऱ्या नफ्यात बचत गटाचा सहभाग राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. त्यामुळे महिलांना केवळ रोजगाराची संधी न मिळता स्वतःच्या उद्योगाच्या माध्यमातून उत्पन्नाचा स्रोत निर्माण करण्याची संधी मिळणार आहे.(Women Financial Independence)
उत्पादन विक्रीसाठी मोफत स्टॉलची सुविधा..
महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळावी, यासाठी गरजेनुसार मोफत स्टॉल उपलब्ध करून देण्याची सुविधाही या उपक्रमात ठेवण्यात आली आहे. त्यामुळे गृहउद्योगातून तयार होणारी उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महिलांना व्यासपीठ मिळणार आहे.(Women Financial Independence)
विशेष म्हणजे, स्वतःचे भांडवल गुंतविणे शक्य नसलेल्या बचत गटांसाठीही या उपक्रमात पर्याय देण्यात आला आहे. अशा गटांना संस्थेकडून कच्चा माल उपलब्ध करून दिला जाणार असून महिलांनी केलेल्या कामाचा योग्य मोबदला देण्यात येणार आहे. त्यामुळे आर्थिक अडचणी असलेल्या महिलांनाही गृहउद्योगाच्या माध्यमातून उत्पन्न मिळविण्याची संधी उपलब्ध होणार आहे.(Women Financial Independence)
महिलांना स्वावलंबनाची नवी संधी - भाजप नगरसेविका हेमलता नरेंद्र पवार
या उपक्रमाबाबत उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना भाजप नगरसेविका पवार यांनी सांगितले की हा केवळ एक कार्यक्रम नसून महिलांसाठी स्वावलंबनाची सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे, महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांच्या विक्रीची चिंता करण्याची गरज नसून त्यासाठी आवश्यक बाजारपेठ आणि मोफत स्टॉलची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.(Women Financial Independence)
तर ज्या बचत गटांकडे स्वतःचे भांडवल नाही, त्यांच्यासाठीही संस्थेच्या माध्यमातून कच्चा माल उपलब्ध करून देत महिलांनी केलेल्या कामाचा योग्य मोबदला देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे महिलांनी केवळ शिकण्यापुरते मर्यादित न राहता शिकणे, माल तयार करणे आणि तो विकणे अशा संपूर्ण प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.(Women Financial Independence)
“एका महिलेची प्रगती म्हणजे संपूर्ण कुटुंबाची प्रगती,”या विचारातून महिलांच्या हातातील कौशल्याला बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात येत आहे. त्यामुळे इच्छुक महिलांनी ही संधी केवळ एका कार्यक्रमापुरती न पाहता गृहउद्योगाच्या माध्यमातून आपल्या आर्थिक स्वावलंबनाची सुरुवात करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.(Women Financial Independence)