मुंबई : (Maharashtra Logistics) देशाच्या मालवाहतूक आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात ऐतिहासिक टप्पा गाठत पूर्व आणि पश्चिम डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचे एकूण २८०० किलोमीटरचे जाळे पूर्ण झाले आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे देशातील मालवाहतुकीचा वेग वाढणार असून, महाराष्ट्रातील बंदरे, उद्योग, निर्यात आणि व्यापारासाठीही मोठ्या संधी निर्माण होणार आहेत.
मंगळवार, दि.८ सप्टेंबर रोजी वडोदरा येथे ३५ हजार कोटी रुपयांहून अधिक विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीएफसीच्या पूर्णत्वाचे विशेष स्वागत केले. (Maharashtra Logistics)
“डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर हा वेगाने विकसित होणाऱ्या भारताची लाइफलाइन आहे,” असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले. “२१व्या शतकातील भारतासाठी हे ऐतिहासिक काम पूर्ण झाले आहे,” असे सांगत त्यांनी डीएफसीमुळे देशाच्या व्यापार आणि वाणिज्य व्यवस्थेत मोठा बदल घडणार असल्याचे अधोरेखित केले. (Maharashtra Logistics)
देशातील औद्योगिक केंद्रे आणि जेएनपीटी सारख्या प्रमुख बंदराला जोडणारा वेस्टर्न डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे लोकार्पण आज देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्याहस्ते रिमोट कंट्रोलद्वारे करण्यात आले. यावेळी राज्यपाल जिष्णू… pic.twitter.com/4SJ5kCyK5h
डीएफसीच्या प्रगतीचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी यांनी २०१४ नंतर या प्रकल्पाला मिळालेल्या वेगावर भर दिला. “२०१४ पूर्वी एक किलोमीटरची नसलेल्या मार्गिकेला आम्ही गती दिली आणि २८०० किलोमीटरच्या कॉरिडॉरचे काम पूर्ण करून दाखवले,” असे त्यांनी सांगितले. पूर्व आणि पश्चिम डीएफसीमुळे देशातील मालवाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वे मार्ग उपलब्ध झाला आहे. त्यामुळे प्रवासी रेल्वे आणि मालगाड्यांच्या वाहतुकीचे नियोजन अधिक कार्यक्षम पद्धतीने करता येणार आहे. या मार्गावर दररोज ४३०हून अधिक मालगाड्या चालविणे शक्य झाले आहे. (Maharashtra Logistics)
३० तासांचा प्रवास १०-१२ तासांत
डीएफसीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मालवाहतुकीच्या वेळेत होणारी मोठी बचत. पंतप्रधानांनी सांगितले की, पूर्वी ट्रकने सुमारे ३० तास लागणारा प्रवास आता १० ते १२ तासांत पूर्ण होऊ शकतो. तसेच १०० किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी लागणारा वेळ पूर्वीच्या तुलनेत निम्म्यापेक्षा कमी झाला आहे. यामुळे इंधनाची बचत होणार असून मालवाहतुकीचा खर्च कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर वाहनांची संख्या आणि इंधनाचा वापर कमी झाल्याने पर्यावरणालाही फायदा होणार आहे. “एका ट्रॅकवर गुंतवणूक करण्यात आली; मात्र त्यातून अनेक फायदे मिळाले,” असे पंतप्रधान मोदींनी डीएफसीच्या बहुआयामी परिणामांचे वर्णन करताना सांगितले. (Maharashtra Logistics)
जेएनपीए ते वडोदरा; एका ट्रेनमध्ये २५० ट्रक एवढा माल
डीएफसीची क्षमता स्पष्ट करणाऱ्या एका महत्त्वपूर्ण उदाहरणाचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. JNPT बंदरातून वडोदरा येथे डबल-स्टॅक कंटेनर मालगाडी धावली. या एका ट्रेनमधून मुंबईहून २५०हून अधिक ट्रकच्या मालाएवढी वाहतूक करण्यात आली. “मोठ्या प्रमाणातील माल आता देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत वेगाने पोहोचवता येईल,” असे पंतप्रधान म्हणाले. (Maharashtra Logistics)
“हंगामी फुले, भाज्या आणि फळे आता ग्राहक आणि मंडईपर्यंत योग्य वेळी पोहोचत आहेत. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे,” असेही मोदींनी नमूद केले. (Maharashtra Logistics)
पायाभूत सुविधांच्या विस्तारामुळे केवळ वाहतूक सुधारत नाही, तर त्यातून उद्योग आणि रोजगाराच्या संधीही निर्माण होतात, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. रेल्वे, रस्ते, बंदरे, विमानतळ आणि गॅस पाइपलाइन यांसारख्या पायाभूत प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत असल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वेसाठी २.७५ लाख कोटी रुपयांहून अधिक तरतूद करण्यात आल्याचा उल्लेख करत मोदी म्हणाले, “रेल्वेच्या आधुनिकीकरणावर होणारा खर्च हजारो-हजारो नव्या रोजगारांची निर्मिती करत आहे.” (Maharashtra Logistics)
समर्पित मालवाहतूक मार्गिका नेटवर्क पूर्ण होणे ही ऐतिहासिक उपलब्धी : राज्यपाल जिष्णु देव वर्मा
याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले, पूर्व समर्पित मालवाहतूक मार्गिका यापूर्वीच कार्यान्वित झाली असून, पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गिकेच्या पूर्णत्वामुळे देशातील संपूर्ण समर्पित मालवाहतूक मार्गिका नेटवर्क आता पूर्ण झाले आहे. (Maharashtra Logistics)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली देशाच्या वाहतूक व लॉजिस्टिक्स पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची आणि ऐतिहासिक उपलब्धी आहे. (Maharashtra Logistics)
समर्पित मालवाहतूक मार्गिकेमुळे रस्ते वाहतुकीऐवजी रेल्वे वाहतुकीकडे मालवाहतुकीचा कल वाढेल, रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होईल, लॉजिस्टिक्सचा खर्च घटेल आणि देशातील पुरवठा साखळी अधिक कार्यक्षम होण्यास मदत मिळेल. (Maharashtra Logistics)
रायगड, ठाणे आणि पालघर या तीन जिल्ह्यांतून सुमारे १७८ मार्ग किलोमीटर लांबीची ही मार्गिका जात असून, महाराष्ट्रातील प्रकल्पाच्या भागासाठी जमिनीच्या खर्चासह १० हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळे विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वासही राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी यावेळी व्यक्त केला. (Maharashtra Logistics)
‘चीपपासून जहाजापर्यंत’ नवा भारत
डीएफसीच्या पलीकडे भारताच्या उत्पादन क्षेत्रातील बदलांचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला. रेल्वे कोच, वॅगन, लोकोमोटिव्ह, सौर ऊर्जा आणि संरक्षण क्षेत्रातील देशांतर्गत उत्पादन वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. “भारत आता चीपपासून जहाजापर्यंत उत्पादनाची नवी गाथा लिहित आहे,” असे मोदी यांनी सांगितले. भारताच्या पायाभूत सुविधा, उत्पादन क्षमता, कौशल्यविकास आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील प्रगतीचा उल्लेख करत त्यांनी २०४७पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य साध्य करण्यासाठी वेगवान विकासाची गरज व्यक्त केली. (Maharashtra Logistics)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.