मुंबई : (Hindu Sikh Unity Forum Canada Mohan Bhagwat Toronto Meet) कॅनडातील हिंदू सिख युनिटी फोरम कॅनडाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्यासोबत टोरंटो येथे झालेल्या भेटीचे वर्णन मनांची भेट, विश्वासाचा संवाद आणि सौहार्दासाठीची बांधिलकी असे केले आहे. या मनमोकळ्या संवादामुळे हिंदू-सिख संबंध अधिक दृढ करण्यासाठी संवाद, परस्पर आदर आणि सेवाभावाचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाल्याचे फोरमने म्हटले आहे.
फोरमने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, संघाच्या शताब्दी वर्षपूर्तीनिमित्त डॉ. भागवत यांच्या अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटन या तीन देशांच्या दौऱ्याचा भाग म्हणून १ सप्टेंबर रोजी कॅनडा दौऱ्यात फोरमच्या प्रमुख स्वयंसेवकांना आणि सदस्यांना डॉ. भागवत यांची भेट घेऊन संवाद साधण्याची संधी मिळाली. संवाद अत्यंत खुलेपणाने आणि मनमोकळ्या वातावरणात झाला. “कोणतेही प्रश्न आधीपासून ठरवलेले नव्हते किंवा कोणत्याही विषयाला टाळण्यात आले नाही,” असे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. संघाचे कार्य, समाजातील त्याची भूमिका आणि हिंदू-सिख संबंधांबाबत वारंवार उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर सदस्यांनी डॉ. भागवत यांच्यासोबत स्पष्ट आणि मोकळेपणाने चर्चा केली. (Hindu Sikh Unity Forum Canada Mohan Bhagwat Toronto Meet)
डॉ. भागवत यांनी सर्व प्रश्न काळजीपूर्वक ऐकून घेतले आणि सविस्तर उत्तरे दिली. गैरसमज आणि पूर्वग्रहांपेक्षा संवादाला प्राधान्य देणे तसेच चुकीच्या समजुती दूर करण्यासाठी प्रत्यक्ष संवाद साधणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केल्याचे फोरमने सांगितले. (Hindu Sikh Unity Forum Canada Mohan Bhagwat Toronto Meet)
या संवादादरम्यान डॉ. भागवत यांच्या संदेशाचा केंद्रबिंदू प्रेम, शांतता, सौहार्द, चारित्र्यनिर्माण आणि सेवाभाव हा होता, असे फोरमने म्हटले. विविधतेचे महत्त्व जपत प्रत्येकाने आपल्या धर्म आणि परंपरांच्या मुळाशी घट्ट जोडलेले राहावे, असा संदेश त्यांनी दिला. “चांगले सिख, चांगले हिंदू आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे चांगले माणूस बना,” यावर डॉ. भागवत यांनी भर दिल्याचे फोरमने सांगितले. ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाचे निष्ठावान, जबाबदार आणि उत्पादक सदस्य बनणे तसेच समाजाच्या प्रगती आणि कल्याणासाठी निःस्वार्थपणे योगदान देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. (Hindu Sikh Unity Forum Canada Mohan Bhagwat Toronto Meet)
हिंदू-सिख संबंधांचा समृद्ध इतिहास
या भेटीदरम्यान हिंदू आणि सिख समाजाचा एकमेकांशी घट्ट जोडलेला इतिहास, परंपरा आणि सांस्कृतिक बंध यांच्यावरही चर्चा झाली. हे संबंध आणखी दृढ करण्यासाठी नियमित संवाद आणि संयुक्त सामाजिक उपक्रम राबविण्याच्या मार्गांवर विचारविनिमय करण्यात आला. एकमेकांचे सण आणि महत्त्वाचे प्रसंग साजरे करणे, समाजसेवेत एकत्रितपणे सहभागी होणे आणि विभाजन करणाऱ्या मुद्द्यांऐवजी एकत्र आणणाऱ्या मूल्यांवर लक्ष केंद्रित करणे, यामुळे हिंदू-सिख संबंध अधिक मजबूत होतील, असे फोरमने म्हटले. (Hindu Sikh Unity Forum Canada Mohan Bhagwat Toronto Meet)
‘पगडी’ अर्पण करून सन्मान
पंजाबी परंपरेचे प्रतीक असलेल्या एका भावनिक कृतीत फोरमच्या सदस्यांनी डॉ. मोहनजी भागवत यांचा पगडी अर्पण करून सन्मान केला. ‘पग्ग वट्ट’ या परंपरेचा संदर्भ देत, या परंपरेचा ऐतिहासिक संबंध मैत्री, बंधुभाव, परस्पर सन्मान आणि विश्वासाच्या नात्याशी असल्याचे फोरमने सांगितले. “लोक एकमेकांना भेटतात, संवाद साधतात, एकमेकांचे म्हणणे ऐकतात आणि परस्परांचा आदर करतात, तेव्हाच पूल निर्माण होतात,” असा संदेश या कृतीमागे असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. यावेळी हिंदू सिख युनिटी फोरम कॅनडाने डॉ. भागवत यांना ‘कम्युनिटी ऑनर अवॉर्ड’ प्रदान केला. विविध समुदायांना एकत्र आणणे, संवाद, सौहार्द, एकता आणि शांततेला प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांच्या गौरवार्थ हा सन्मान देण्यात आल्याचे फोरमने सांगितले. (Hindu Sikh Unity Forum Canada Mohan Bhagwat Toronto Meet)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक