
मुंबई - Fatima Sana Shaikh बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेखने जम्मू आणि काश्मीरच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे कौतुक केले आणि म्हटले की चित्रपट व सांस्कृतिक कार्यक्रम हे लोकांना जोडण्याचे प्रभावी माध्यम आहेत. अशा कार्यक्रमांमुळे देशासोबत आणि जगासोबत काश्मीरचे सांस्कृतिक संबंध अधिक दृढ होतील.
श्रीनगरमधील महोत्सवाच्या निमित्ताने माध्यमांशी बोलताना, फातिमाने काश्मीरला भेट दिल्याचा आनंद व्यक्त केला. इतक्या वर्षांनंतर येथे परत येणे म्हणजे घरी परत आल्यासारखे वाटले, असे ती म्हणाली. या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याचा भाग असल्याचा आनंद आणि अभिमान या अभिनेत्रीने व्यक्त केला आणि यात सहभागी असलेल्या सर्वांचे आभार मानले. Fatima Sana Shaikh
फातिमा म्हणाली की, कोणताही चित्रपट महोत्सव किंवा सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा असतो, कारण तो लोकांना एकत्र आणतो. सिनेमादेखील ही भूमिका बजावतो. जम्मू आणि काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन हा एक महत्त्वाचा उपक्रम असल्याचे तिने सांगितले आणि अशा उपक्रमांमुळे या प्रदेशाचे सांस्कृतिक वातावरण समृद्ध होईल, असेही ती म्हणाली.
भविष्यात काश्मीरमध्ये असे महोत्सव आयोजित होण्याच्या शक्यतेबद्दल विचारले असता, ती म्हणाली , "शंभर टक्के, मला वाटते की ते आधीपासूनच होत आहे." तिने सांगितले की, पूर्वी पासूनच काश्मीरमध्ये चित्रपटांचे चित्रीकरण होत आले आहे आणि ते आजही सुरू आहे. Fatima Sana Shaikh