
मुंबई -(Priyanka Chopra)ग्लोबल आइकॉन प्रियांका चोप्रा यंदाच्या LVMH Prize सोहळ्यात प्रतिष्ठित Karl Lagerfeld Prize प्रदान करणार असून ती हॉलिवूड स्टार जेनिफर लॉरेन्स आणि थाई अभिनेत्री Urassaya ‘Yaya’ Sperbund यांच्यासोबत सादरकर्त्यांच्या यादीत सहभागी होणार आहे.
जेनिफर लावरेन्स आणि प्रियांका चोप्रा यांच्यासोबत Louis Vuitton ची face असलेली Urassaya “Yaya” या कार्यक्रमात सहभागी होणार आहे.(Priyanka Chopra)
या सोहळ्यात फॅशनमधील नव्या पिढीतील प्रतिभेचा गौरव केला जातो. ज्यामध्ये नऊ नवीन उदयोन्मुख डिझायनर्स तीन प्रतिष्ठित पुरस्कारांसाठी स्पर्धा करणार आहेत.(Priyanka Chopra)
हा क्षण प्रियांकाच्या सतत विस्तारत असलेल्या ग्लोबल फॅशन कैलेंडर मध्ये महत्त्वपूर्ण ठरतोय. Dior ambassador आणि international fashion circuit वरील एक प्रभावशाली व्यक्तिमत्त्व म्हणून,प्रियांका फॅशनच्या सर्वात मोठ्या मंचांशी जोडली गेली आहे, पॅरिसमधील haute couture front rows पासून जगभरातील प्रमुख luxury moments पर्यंत. तिच्या उपस्थितीची चर्चा नियमितपणे जगभरात होते, त्यामुळे LVMH Prize मध्ये तिची उपस्थिती ही fashion, luxury आणि pop culture वरील तिच्या प्रभावाचा स्वाभाविक विस्तार ठरते.(Priyanka Chopra)
प्रियांका सारखी अभिनेत्री एवढ्या बड्या फॅशन इवेंटसाठी सादरकर्त्यांच्या यादीचे नेतृत्व करत असल्याने ही गोष्ट नक्कीच कौतुकास्पद आहे.(Priyanka Chopra)