मुंबई (Pink Power Run 3.0) : हैदराबादमध्ये २७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या पिंक पॉवर रन ३.० या आंतरराष्ट्रीय हाफ मॅराथॉन आणि फिटनेस उपक्रमात तब्बल २० हजार स्पर्धक सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाची घोषणा एका पत्रकार परिषदेत करण्यात आली. यावेळी सुधा रेड्डी फाउंडेशनच्या संस्थापक आणि MEIL च्या संचालिका सुधा रेड्डी, 'मिस वर्ल्ड २०२५' ओपल सुचाता चुआंगसरी आणि १० वर्षांचा अनुभव असलेल्या ब्रेस्ट ऑन्कोसर्जन (स्तन कर्करोग तज्ज्ञ) डॉ. प्रज्ञा चिगुरुपती उपस्थित होत्या. (Pink Power Run 3.0)
फाउंडेशनने 'माइल्स फॉर मॅमोग्राम्स' (Miles for Mammograms) हा उपक्रम सुरू करण्यासाठी AIG हॉस्पिटल्ससोबत भागीदारी केली आहे. या कार्यक्रमांतर्गत, स्पर्धकांनी कापलेले एकूण अंतर हे गरजू रुग्णांसाठी वैद्यकीय निदान सहाय्यामध्ये रूपांतरित केले जाईल. एकूण कापलेल्या प्रत्येक १०० किमी अंतरासाठी, 'सुधा रेड्डी फाउंडेशन' एका मोफत स्तनाच्या कर्करोग तपासणीचा (ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग) आणि एका मोफत मॅमोग्राम चाचणीचा खर्च उचलणार आहे. या वेळी अधिकृत जर्सी व पदकाचे अनावरण करण्यात आले. HPCL, BPCL, IOCL, AIG, Decathlon यांसारख्या कॉर्पोरेट संस्थाकडून या उपक्रमाला पाठबळ लाभले आहे. (Pink Power Run 3.0)
हाफ मॅरेथॉनमधील १०० हून अधिक विजेत्यांसाठी ७५ लाख रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर करण्यात आली आहे.
शर्यतीचे प्रकार:
AIMS-प्रमाणित २१.०९७ किमी हाफ मॅराथॉन
१० किमी, ५ किमी आणि ३ किमी शर्यती
स्पर्धेचे ठिकाण: पीपल्स प्लाझा, नेकलेस रोड, हैदराबाद
तारीख: दि. २७ सप्टेंबर