स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल; मुंबई जागतिक गुंतवणुकीचे केंद्र : अमित शाह, महाराष्ट्राच्या आर्थिक सामर्थ्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांकडून विशेष कौतुक

startups

मुंबई : (Maharashtra Tops India in Startups) पश्चिम क्षेत्र हे देशाच्या आर्थिक, औद्योगिक आणि वित्तीय विकासाचे प्रमुख केंद्र असून, महाराष्ट्र या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांनी केले. महाराष्ट्रातील स्टार्टअप क्षेत्रातील प्रगतीचा विशेष उल्लेख करताना, राज्यात ३३ हजार ८७२ स्टार्टअप्स कार्यरत असून महाराष्ट्र स्टार्टअपच्या संख्येत देशात पहिल्या क्रमांकावर असल्याचे शाह यांनी सांगितले. मुंबई ही जागतिक भांडवल आणि गुंतवणुकीसाठी महत्त्वाचे केंद्र म्हणून पुढे येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
 
गोव्याची राजधानी पणजी येथे पश्चिम क्षेत्रीय परिषदेच्या २८व्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवताना शाह बोलत होते. बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल तसेच दादरा आणि नगर हवेली व दमण आणि दीवचे प्रशासक प्रफुल्ल के. पटेल यांच्यासह केंद्र व राज्य सरकारांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (Maharashtra Tops India in Startups)
 
पश्चिम क्षेत्राचे महत्त्व स्पष्ट करताना शाह यांनी ‘WEST’ या संकल्पनेचा उल्लेख केला. ‘W’ म्हणजे Wealth आणि Finance, ‘E’ म्हणजे Export आणि Ports, ‘S’ म्हणजे Startups आणि Semiconductor, तर ‘T’ म्हणजे Tourism आणि Blue Economy. या सर्व क्षेत्रांमध्ये पश्चिम भारताचा देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. (Maharashtra Tops India in Startups)
 
महाराष्ट्राचा स्टार्टअपमध्ये दबदबा
 
केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी महाराष्ट्राच्या स्टार्टअप क्षेत्रातील कामगिरीचा विशेष उल्लेख केला. ३३ हजार ८७२ स्टार्टअप्ससह महाराष्ट्र देशात अव्वल असल्याचे त्यांनी सांगितले. नवउद्योजकता, तंत्रज्ञान आणि वित्तीय क्षेत्रातील वाढीमुळे महाराष्ट्र देशाच्या आर्थिक विकासाचा महत्त्वाचा आधारस्तंभ ठरत असल्याचे त्यांच्या वक्तव्यातून अधोरेखित झाले. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून जागतिक भांडवलासाठी मोठे केंद्र म्हणून उदयास येत आहे, असेही शाह यांनी स्पष्ट केले. त्यामुळे महाराष्ट्रातील वित्तीय सेवा, स्टार्टअप्स आणि गुंतवणूक क्षेत्राचा विस्तार देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ देत असल्याचे त्यांनी नमूद केले. (Maharashtra Tops India in Startups)
 
गुजरातमधील धोलेरा हे सेमीकंडक्टर क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र बनत असल्याचे सांगताना शाह यांनी मुंद्रा आणि दीनदयाळ बंदरांच्या व्यापारातील योगदानाचाही उल्लेख केला. गोव्यात पर्यटन क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित करताना दरवर्षी एक कोटीहून अधिक पर्यटक राज्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. (Maharashtra Tops India in Startups)
 
प्रादेशिक परिषदांच्या कामाला वेग
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १२ वर्षांत सहकारी संघराज्यवादाला बळ मिळाले असल्याचे शाह म्हणाले. २००४ ते २०१४ या काळात प्रादेशिक परिषद आणि त्यांच्या स्थायी समित्यांच्या मिळून केवळ २५ बैठका झाल्या. मात्र २०१४ पासून आतापर्यंत ७१ बैठका झाल्या आहेत. या बैठकींमध्ये १,८९३ मुद्द्यांवर चर्चा होऊन १,४४५ मुद्दे निकाली काढण्यात आले आहेत. प्रादेशिक परिषद आता केवळ आंतरराज्यीय वाद सोडविण्याचे व्यासपीठ राहिलेले नसून, जनकल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्याचे प्रभावी माध्यम बनले आहे. पश्चिम क्षेत्रातील राज्यांमध्ये सध्या कोणताही आंतरराज्यीय वाद शिल्लक नसणे ही मोठी उपलब्धी असल्याचे शाह यांनी सांगितले. (Maharashtra Tops India in Startups)
 
सायबर गुन्हे, अमली पदार्थांविरोधात आघाडीचे आवाहन
 
नवीन न्याय संहितांची प्रभावी अंमलबजावणी, अमली पदार्थांविरोधातील लढा आणि सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पश्चिम क्षेत्राने देशात आघाडीची भूमिका बजावावी, असे आवाहन शाह यांनी केले. सर्व सहकारी बँकांनी सायबर सुरक्षा यंत्रणांशी जोडले जाण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. बैठकीत महिला व बालकांविरोधातील अत्याचारांच्या प्रकरणांचा जलद तपास, फास्ट ट्रॅक न्यायालये, ERSS-112, अन्नसुरक्षा, आयुष्मान भारत, रेल्वे विकास, पर्यावरण मंजुरी, शहरी नियोजन, वीजपुरवठा, कुपोषण निर्मूलन, PACS संगणकीकरण आणि डिजिटल पायाभूत सुविधांसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. पश्चिम भारताच्या आर्थिक सामर्थ्यात महाराष्ट्राची भूमिका निर्णायक असून, स्टार्टअप्स आणि वित्तीय क्षेत्रातील राज्याची आघाडी देशाच्या विकासाला नवी दिशा देणारी ठरत आहे, असा संदेश अमित शाह यांच्या भाषणातून मिळाला. (Maharashtra Tops India in Startups)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर