कोकणात गणेशोत्सवासाठी रेल्वेची अतिरिक्त सुविधा; मध्य रेल्वे ३४ विशेष गाड्या चालवणार

IRCTC Konkan special train 
 
मुंबई : (IRCTC Konkan special train) गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार लोकमान्य टिळक टर्मिनस–मडगावदरम्यान ४ आरक्षित विशेष गाड्या आणि पनवेल–चिपळूणदरम्यान ३० अनारक्षित मेमू सेवा, अशा एकूण ३४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
 
लोकमान्य टिळक टर्मिनस- मडगावदरम्यान ४ विशेष सेवा
 
गाडी क्रमांक ०१००३ लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १६ आणि १९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ७.५० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ११.४५ वाजता मडगाव येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०१००४ मडगाव येथून १५ आणि १८ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता सुटेल. (IRCTC Konkan special train)
 
ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ६.०५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या गाड्यांना ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमळी येथे थांबे देण्यात आले आहेत. विशेष गाडीमध्ये ३ वातानुकूलित तृतीय श्रेणी, ८ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय आसनांसह गार्ड्स ब्रेक व्हॅन, अशी संरचना असेल. (IRCTC Konkan special train)
 
पनवेल-चिपळूणदरम्यान ३० अनारक्षित मेमू सेवा
 
कोकणातील प्रवाशांसाठी पनवेल–चिपळूणदरम्यान ३० अनारक्षित मेमू सेवाही चालवण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक ०११५९ पनवेल येथून १० ते १४ सप्टेंबर आणि १८ ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दररोज दुपारी ३.२० वाजता सुटून रात्री १०.२० वाजता चिपळूण येथे पोहोचेल. या मार्गावर एकूण १५ सेवा असतील. परतीच्या दिशेने गाडी क्रमांक ०११६० चिपळूण येथून सकाळी ९ वाजता सुटून दुपारी २.३० वाजता पनवेल येथे पोहोचेल. या गाडीच्या देखील १५ सेवा चालवण्यात येणार आहेत. (IRCTC Konkan special train)
 
मात्र, या मेमू सेवा १५ ते १७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत चालवल्या जाणार नाहीत. (IRCTC Konkan special train)
 
पनवेल ते चिपळूणदरम्यान या मेमू गाड्यांना पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड आणि अंजनि येथे थांबे असतील. या गाड्यांना ८ डब्यांची मेमू रॅक जोडण्यात येणार आहे. (IRCTC Konkan special train)
 
८ सप्टेंबरपासून आरक्षण सुरू
 
गाडी क्रमांक ०१००३ साठीचे आरक्षण ८ सप्टेंबर २०२६ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच IRCTC संकेतस्थळावर सुरू होईल. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने वाढवलेल्या या सेवांमुळे कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी हाताळण्यास मदत होणार असून, चाकरमान्यांचा गणेशोत्सवाचा प्रवास अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे. (IRCTC Konkan special train)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर