लाकडाची भट्टी वापरणे महागात पडले; कल्याणातील ‘प्रिन्स बेकरी’ला अन्न व औषध प्रशासनाचा दणका

धूर आणि प्रदूषणाच्या तक्रारीनंतर कारवाई; तपासणीत नियमभंग आढळल्याने बेकरी सील

    07-Sep-2026
FDA Action Wood Furnace 
 
ठाणे : (FDA Action Wood Furnace) पाव निर्मितीसाठी लाकूड आणि कोळशाच्या भट्टीचा वापर केल्याप्रकरणी कल्याणमधील ‘प्रिन्स बेकरी’वर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई करत बेकरी सील केली आहे. बेकरीच्या भट्टीतून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याने परिसरातील नागरिकांना त्रास होत असून प्रदूषण वाढत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या. या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या तपासणीत नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली.
 
पाव आणि इतर बेकरी पदार्थ तयार करण्यासाठी लाकडाचा वापर करून भट्टी पेटवली जात असल्याची तक्रार प्रशासनाकडे करण्यात आली होती. या भट्टीतून निघणाऱ्या धुरामुळे परिसरात प्रदूषण होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला होता. त्यामुळे संबंधित यंत्रणेकडून बेकरीची तपासणी करण्यात आली. (FDA Action Wood Furnace)
 
उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरही लाकडाची भट्टी?
 
राज्यातील बेकरी व्यवसायांमध्ये इंधन म्हणून लाकूड आणि कोळशाचा वापर करण्याऐवजी एलपीजी, पाइपद्वारे येणारा गॅस किंवा विद्युत भट्टीचा वापर करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर बेकरी व्यवसायिकांनी संबंधित नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे. (FDA Action Wood Furnace)
 
मात्र, प्रिन्स बेकरीच्या तपासणीदरम्यान पाव तयार करण्यासाठी लाकूड आणि कोळशाचा वापर होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्याने अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली. त्यानंतर बेकरी सील करण्यात आली. (FDA Action Wood Furnace)
 
‘लाकूड-कोळशाचा वापर होत असल्याने भट्टी सील’
 
या कारवाईबाबत बेकरीतील कर्मचारी नसीम खान याने सांगितले की, भट्टीमध्ये इंधन म्हणून लाकूड आणि कोळशाचा वापर केला जात असल्याने संबंधित भट्टी सील करण्यात आली. इतर भट्ट्या सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच, या कारवाईपूर्वी नोटीस मिळाली नसल्याचे आणि आता नोटीसची प्रतीक्षा असल्याचे त्यांनी नमूद केले. (FDA Action Wood Furnace)
 
कल्याणातील इतर बेकरी व्यावसायिकांचेही धाबे दणाणले
 
नामांकित बेकरीवर अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या या कारवाईनंतर कल्याणमधील इतर बेकरी व्यावसायिकांमध्येही नियमपालनाबाबत चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः लाकूड किंवा कोळशावर चालणाऱ्या भट्ट्यांचा वापर करणाऱ्या बेकरींवर प्रशासनाची पुढील कारवाई होणार का, याकडे व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे. (FDA Action Wood Furnace)
 
नागरिकांच्या आरोग्याचा आणि परिसरातील प्रदूषणाचा प्रश्न लक्षात घेता बेकरी व्यवसायात लागू असलेल्या नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर प्रिन्स बेकरीवरील कारवाईमुळे ‘नियम तोडाल तर कारवाईला सामोरे जावे लागेल’, असा संदेश बेकरी व्यावसायिकांना गेल्याची चर्चा कल्याणमध्ये रंगली आहे. (FDA Action Wood Furnace)
 
 




संबंधित मजकूर