अंबरनाथमध्ये 'लव जिहाद' ; १३ वर्षीय हिंदू अल्पवयीन मुलीचे अपहरण करून पळवून नेणाऱ्या धर्मांध फैजानच्या मुसक्या आवळल्या

    07-Sep-2026
 
Child Protection
 
ठाणे : ( विशाल वैद्य ) (Child Protection) इयत्ता आठवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय हिंदू अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी अंबरनाथ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलीला पळवून नेणाऱ्या धर्मांध जिहादी फैजान च्या मुसक्या अंबरनाथ पोलिसांनी आवळल्या आहेत.
 
पीडित मुलगी दि. ४ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता ट्युशनला जाते असे सांगून घराबाहेर पडली होती. बराच वेळ झाला तरी ती घरी परतली नाही, म्हणून कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. तेव्हा ती आरोपी फैजान (वय अंदाचे २७, रा. अंबरनाथ) याच्यासोबत निघून गेल्याचे निदर्शनास आले. (Child Protection)
 
याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून ठाणे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ४७२/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. (Child Protection)
 
पोलिसांची टाळाटाळ ?
 
या संपुर्ण प्रकरणात अंबरनाथ पोलिसांची वर्तणूक अत्यंत संशयास्पद असल्याचा आरोप करण्यात येत आहे. काही हिंदुत्ववादी कार्यकर्ते अन्य प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गेले असता त्यांना एक महिला तिथे रडताना दिसून आली. त्यांनी चौकशी केली असता धक्कादायक बाब समोर आली. तिच्या अल्पवयीन मुलीला फैजान नावाचा एक अंदाजे २७ वर्षीय धर्मांध जिहादी फूस लावून पळवून घेऊन गेला आहे आणि तरीही पोलीस हा संपूर्ण प्रकार दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचे तिच्या बोलण्यातून स्पष्ट झाले. (Child Protection)
 
त्यानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी या प्रकरणी लक्ष घातल्यानंतर अचानक अंबरनाथ पोलीस ऍक्टिव्ह झाले आणि त्यांनी मुलीच्या शोधार्थ पथक रवाना केले. दरम्यान फैजान आणि त्या मुलीला मध्य प्रदेश बॉर्डर वरून ताब्यात घेऊन अंबरनाथ येथे आणण्यात आले, नंतर फैजान ला अटक करण्यात आली असून सध्या तो कोठडीत आहे. (Child Protection)
 
संशयास्पद भूमिका
 
एकूणच या प्रकरणात पोलीस हे सातत्याने लव जिहाद प्रकरण असल्याने जाणीवपूर्वक कठोर कलमे लावण्यास टाळत असल्याचा आरोप मुलीच्या आई वडिलांनी केला आहे. इतकेच नव्हे तर पोलीस स्टेशन मध्ये दोघांना आणल्यावर तुमची मुलगी स्वतःहून मुलाबरोबर गेली असे म्हणत एक प्रकारे दबाव आणण्याच्या प्रयत्न ही होत असल्याचा आरोप पालक आणि हिंदुत्ववादी करत आहेत. मुळात अल्पवयीन १३ वर्षीय मुलगी असल्याने ती स्वतःहून २७ वर्षांच्या जिहादी फैजान सोबत जाणे हा मुद्दाच नसून पोलिसांनी फक्त अपहरणाचा गुन्हा न नोंदवता फैजान विरोधात पोक्सो कायद्याच्या अंतर्गत ही गुन्हा दाखल करावा अशी मागणी तिच्या पालकांनी केली आहे. (Child Protection)
 
रेल्वे प्रवासात ओळख
 
अवघ्या महिना भरापूर्वी रेल्वेने जात असताना पीडित मुलीला हा फैजान भेटला होता. प्रवासात त्याने तिचे इंस्टाग्राम अकाउंट विचारले त्यानंतर पीडित मुलीच्या तो मागील काही दिवसांपासून इंस्टाग्रामच्या माध्यमातून संपर्कात होता आणि त्याचद्वारे तिला त्यानं प्रेमाच्या जाळ्यात ओढत फूस लावून पळवून नेल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. (Child Protection)
 
पोक्सो कलम लावण्याची गरज
 
१३ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणात केवळ BNS १३७(२) हे अपहरणाचे साधे कलम लावण्यात आल्याने पोलिसांच्या भूमिके बाबत आम्हाला आश्चर्य वाटत आहे. अल्पवयीन मुलगी स्वतःहून कशी काय एखाद्या सोबत पळून जाऊ शकते अंबरनाथ पोलीस जिहाद्यांच्या दबावाखाली आहे की काय? या गुन्ह्यात पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत कठोर कलमे ही लावायला हवीत - अंजना वाल्मिकी, प्रखंडमंत्री विहिंप
 
हिंदूंनो सजग व्हा!
 
"१३ वर्षाच्या मुलीला प्रेम तरी काय कळतं? तिला फूस लावून जाळ्यात ओढलं जातंय नंतर आपल्याला हवं तसंच जिहाद्यांकडून तिला कस वागावं हे शिकवलं जातंय, तिचा ब्रेनवॉश केला जातोय. आणि ही एक केस नाहीये , हा पॅटर्न आहे. अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली - सगळीकडे हेच सुरू आहे.याबाबत हिंदू समाजाने अधिक सजग होण्याची गरज आहे." - सचिन गायकवाड, हिंदुत्ववादी विचारवंत, युट्युबर (Child Protection)
 
 




संबंधित मजकूर