भिवंडीत ५०० किलो संशयित गोमांस जप्त; गोमांस नेणाऱ्या जिहाद्याने पोलिसाच्या अंगावर गाडी घालून ठार करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार

    07-Sep-2026
भिवंडीत ५०० किलो संशयित गोमांस जप्त 
 
ठाणे : (Bhiwandi) भिवंडीच्या भोईवाडा पोलिसांनी कारवाई करत एका कारमधून सुमारे ५०० किलो गोमांस जप्त केले असून, या प्रकरणी २२ वर्षीय धर्मांध जिहादी मुसलमान तरुणाला अटक केली आहे. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने पोलिस कर्मचाऱ्याच्या दिशेने वाहन वेगाने नेऊन त्याला धडक देऊन पोलिसांच्या अंगावर वाहन नेण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
अटक करण्यात आलेल्या जिहादी धर्माध आरोपीचे नाव शाहिद खान (२२) असून तो कुर्ला पूर्व येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणातील अन्य कथित साथीदारांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. (Bhiwandi)
 
पहाटे कार संशयास्पदरीत्या फिरताना आढळली
 
पोलिसांच्या माहितीनुसार, ४ सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे पाचच्या सुमारास भिवंडीतील कारिवली रोडवरील गणपती मंदिराजवळ ही घटना घडली. पोलिस कर्मचारी अमोल साळुंखे यांना काळ्या रंगाची फियाट लीनिया कार संशयास्पदरीत्या जाताना दिसली. त्यांनी चालकाला वाहन थांबविण्याचा इशारा केला. (Bhiwandi)
 
मात्र, चालकाने वाहन थांबविण्याऐवजी ते पोलिस कर्मचाऱ्याच्या दिशेने वेगाने नेत पोलिसाच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. साळुंखे यांनी प्रसंगवधान दाखवत वेळीच वाहन बाजूला घेतल्याने त्यांना दुखापत झाली नाही. (Bhiwandi)
 
पोलिसांनी पाठलाग करून वाहन अडवले
 
यानंतर पोलिस पथकाने संबंधित कारचा पाठलाग सुरू केला. अखेर दरगाह रोडवरील सुतार आळी परिसरातील मुरलीधर मंदिराजवळ कार अडवण्यात पोलिसांना यश आले. (Bhiwandi)
 
वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये सुमारे ५०० किलो मांस आढळून आले. पोलिसांनी हे मांस गोमांस असल्याचा संशय व्यक्त केला असून, त्याबाबत पुढील तपास सुरू आहे. (Bhiwandi)
 
गोवंशाची कत्तल करून मांस वाहतूक केल्याचा आरोप
 
पोलिसांच्या तपासानुसार, शाहिद खान याच्यासह मस्तान शेख, सैद्दाम शेख, दावल शेख, फहीम बाबा आणि अन्य तीन व्यक्ती गोवंशाची कत्तल केल्यानंतर मांस मिळवून त्याची कथितरित्या बेकायदा वाहतूक व विक्री करण्याच्या प्रकरणात सहभागी असल्याचा संशय आहे. (Bhiwandi)
 
हे मांस गोवंडीतील छेडानगर महामार्ग परिसरात विक्रीसाठी नेले जात असल्याचा पोलिसांचा प्राथमिक दावा आहे. मात्र, मांसाचा नेमका स्रोत आणि ते कुठे नेण्यात येत होते, याचा तपास अद्याप सुरू आहे. (Bhiwandi)
 
विविध कलमांनुसार गुन्हा दाखल
 
भोईवाडा पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील कलम १०९(१), ३२५ आणि ३(५) तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यातील संबंधित तरतुदी आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. (Bhiwandi)
 
या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध घेण्याबरोबरच जप्त करण्यात आलेल्या मांसाचा स्रोत, वाहतुकीचा मार्ग आणि त्याच्या नियोजित विक्रीचे ठिकाण याबाबत पोलिस तपास करत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामदास कोलते करीत आहेत. (Bhiwandi)
 
 




संबंधित मजकूर