लोढा हेवन येथील बेकायदा आठवडी बाजारावर महापालिकेच्या ई प्रभागाची धडक कारवाई !

महापालिका पथकाला विरोध; शासकीय कामात अडथळा व कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीप्रकरणी गुन्हा दाखल

    06-Sep-2026   
 
 Lodha Heaven Illegal Weekly Market
 
कल्याण (Lodha Heaven Illegal Weekly Market) : केडीएमसी क्षेत्रातील इ प्रभाग अंतर्गत येणाऱ्या लोढा हेवन येथील आठवडी बाजारावर महापालिका पथकाने कारवाई केली. यावेळी फेरीवाला आणि जागा मालकाने कारवाईला विरोध केला. दरम्यान शासकीय कामात अडथळा व कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
महापालिका क्षेत्रातील अनधिकृत आठवडी बाजार बंद करण्या बाबत महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी दिलेल्या निर्देशानुसार महापालिका प्रशासनाने अनधिकृत आठवडी बाजारांविरोधात कारवाईला सुरुवात केली आहे.
 
याच अनुषंगाने इ प्रभाग क्षेत्रातील लोढा हेवन, निळजे येथील ग्रीन पार्क टॉवरच्या मागील बाजूस दर शुक्रवारी भरविण्यात येणाऱ्या आठवडी बाजारावर शुक्रवार दि. ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी महापालिकेच्या पथकाने संयुक्त कारवाई केली. इ प्रभागाचे सहा.आयुक्त सचिन तामखेडे यांच्या अधिपत्याखाली मुख्यालयातील फेरीवाला नियंत्रण पथक व इ प्रभागातील फेरीवाला पथक यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान बाजारातील फेरीवाल्यांकडून तसेच जागा मालक राजा पाटील यांच्याकडून महापालिका पथकाला तीव्र विरोध करण्यात आला. (Lodha Heaven Illegal Weekly Market)
 
कारवाईस विरोध करताना काही व्यक्तींनी महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने तसेच जमावाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याने त्याचप्रमाणे वाहन अंगावर घालण्याचा प्रयत्न केल्याने तणाव निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात आली. पोलिसांच्या सहकार्याने विरोध मोडून काढत सदर आठवडी बाजार बंद करण्यात आला. (Lodha Heaven Illegal Weekly Market)
 
महापालिका कर्मचाऱ्यांच्या शासकीय कामात अडथळा आणणे, त्यांना विरोध करणे तसेच धक्काबुक्की केल्याप्रकरणी संबंधित व जागा मालकाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
दरम्यान, कारवाईच्या ठिकाणी अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे तसेच अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी भेट देऊन पाहणी केली. सदर ठिकाणी कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी लवकरच संबंधित विभागांची बैठक घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. (Lodha Heaven Illegal Weekly Market)
 
महापालिका क्षेत्रातील अनधिकृत आठवडी बाजारांवर यापुढेही नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असून, शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. (Lodha Heaven Illegal Weekly Market)





संबंधित मजकूर