शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार - उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

    05-Sep-2026   
Sunetra Ajit Pawar 
 
पुणे : (Sunetra Ajit Pawar)  शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणे, ही सक्षम आणि ज्ञानसमृद्ध समाजाच्या उभारणीची भक्कम पायाभरणी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपली भावना व्यक्त केली.
 
शनिवारी, शिक्षक दिनानिमित्त श्री गणेश कला क्रीडा रंगमंच, पुणे येथे आयोजित जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार, अध्यक्ष चषक तसेच शिष्यवृत्ती परीक्षेतील राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळा पार पडला. यावेळी शिक्षण क्षेत्रात आपल्या कार्यातून उल्लेखनीय योगदान देणाऱ्या आदर्श शिक्षकांचा आणि शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आला. (Sunetra Ajit Pawar)
 
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, "महाराष्ट्राच्या विकासात शिक्षणाला नेहमीच अग्रक्रम देण्याची भूमिका अजितदादांची होती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार, आधुनिक आणि जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे, हे त्यांचे स्वप्न होते. पुणे मॉडेल स्कूल, डिजिटल शिक्षण आणि विविध आधुनिक शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून हा विचार पुढे नेण्यासाठी शासन कटिबद्ध आहे." (Sunetra Ajit Pawar)
 
डिजिटल शिक्षण आणि एआय साक्षरतेची जोड आवश्यक
 
"पुणे ही शिक्षणाची पंढरी आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी दिलेला शिक्षणाचा समृद्ध वारसा आज जिल्हा परिषद शाळांच्या माध्यमातून पुढे नेला जात आहे. या शाळांमध्ये शिकणारी मुले ही ग्रामीण महाराष्ट्राची खरी ताकद आहेत. बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकी ज्ञान न देता कौशल्याधारित आणि मूल्याधारित शिक्षणासोबत डिजिटल शिक्षण आणि एआय साक्षरतेची जोड देणे आवश्यक आहे," असेही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या. (Sunetra Ajit Pawar)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर