हंडीच्या थरांवर इतिहासाचा थरार ! शिवसागरच्या गोविंदांनी साकारली ‘पावनखिंड’

बाजीप्रभूंच्या शौर्याने जागवल्या आठवणी

Shivsagar Govinda Pathak 
 
मुंबई : (Shivsagar Govinda Pathak) गोपाळकाल्याच्या उत्साहात मुंबईच्या रस्त्यांवर ‘गोविंदा आला रे’चा जल्लोष सुरू असताना, मालाड पूर्वेकडील शिवसागर गोविंदा पथकाने दहीहंडीला इतिहासाची जोड देत अनोखा संदेश दिला. गेल्या 11 वर्षांपासून दहीहंडीच्या माध्यमातून ऐतिहासिक आणि सामाजिक विषय मांडणाऱ्या या पथकाने यंदा ‘पावनखिंड’ हा देखावा सादर केला.
मानवी मनोऱ्याचे थर रचत असतानाच त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या इतिहासातील शौर्यगाथा साकारण्यात आली. बाजीप्रभू देशपांडे यांचा त्याग आणि पावनखिंडीतील पराक्रम गोविंदांनी आपल्या सादरीकरणातून जिवंत केला. दहीहंडीच्या जल्लोषात साकारलेला हा इतिहासाचा थरार पाहताना उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. (Shivsagar Govinda Pathak)
शिवसागर पथकासाठी दहीहंडी म्हणजे केवळ हंडी फोडण्याचा उत्सव नाही. शरीराच्या ताकदीसोबत इतिहासाची ताकद दाखवण, हा पथकाचा गेल्या अनेक वर्षांचा प्रयत्न आहे. आजच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचा पराक्रम समजावा, त्यांच्या बलिदानाची जाणीव व्हावी आणि महाराष्ट्राच्या इतिहासाची नाळ तरुणाईशी जोडली जावी, यासाठी दहीहंडीच्या व्यासपीठाचा वापर केला जातो. (Shivsagar Govinda Pathak)
यापूर्वीही शिवसागरने ‘गड आला पण सिंह गेला’, ‘अफजलखान वध’, महिला सबलीकरण आणि ‘छावा’ यांसारखे ऐतिहासिक विषय सादर केले आहेत. 2025 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मापासून बलिदानापर्यंतचा प्रवास साकारण्यात आला होता. या सादरीकरणासाठी गोविंदांनी दीड महिन्यापासून सराव केला होता. इतिहासासोबत सामाजिक प्रश्नांनाही पथकाने आपल्या देखाव्यांमध्ये स्थान दिले आहे. शेतकरी आत्महत्या, शेतीसमोरील संकटं, महिला सुरक्षा, महिलांवरील अत्याचार, व्यसनमुक्ती आणि प्रदूषण यांसारख्या विषयांवरही गोविंदांनी जनजागृती केली आहे. (Shivsagar Govinda Pathak)
पथकाचे अध्यक्ष किशोर कदम यांच्या मते, दहीहंडीच्या माध्यमातून मिळणारं व्यासपीठ केवळ मनोरंजनासाठी न वापरता इतिहास आणि समाजप्रबोधनासाठी वापरलं पाहिजे. त्यामुळे शिवसागरच्या गोविंदांसाठी प्रत्येक थर हा केवळ उंचीचा नसून, महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून देणारा थर ठरतो. (Shivsagar Govinda Pathak)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर