पनवेल: (Palaspe Phata) आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिलेल्या सूचनेनुसार, पळस्पे फाटा ते कोन फाटा मार्गावरील वाहतूक कोंडी आणि सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची ४ सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी पनवेल शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी, पंचायत समिती सदस्य राजेंद्र पाटील, तसेच कोळखे, डेरवली आणि कोन येथील पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी संबंधित प्रशासनाला आवश्यक सूचना केल्या होत्या. त्यानुसार, वाहतूक कोंडीची समस्या, रस्त्याची सद्यस्थिती आणि सुरू असलेल्या कामाचा आढावा पाहणीद्वारे घेण्यात आला. वाहतूक सुरळीत करण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत संबंधित कंत्राटदारांशी चर्चा करण्यात आली. (Palaspe Phata)
यावेळी गवार कंपनीचे कंत्राटदार रोहित मलिक यांच्याशी रस्त्याच्या कामाबाबत सविस्तर चर्चा झाली. रस्त्याचे काम वेगाने पूर्ण करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे भाग तातडीने मोकळे करावेत, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या. (Palaspe Phata)
त्यावर, ९ सप्टेंबर २०२६ पर्यंत रस्त्याचे संपूर्ण काम पूर्ण करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात येईल, असे आश्वासन कंत्राटदार रोहित मलिक यांनी दिले.
पळस्पे फाटा ते कोन फाटा हा पनवेल परिसरातील महत्त्वाचा वाहतूक मार्ग आहे. (Palaspe Phata)
या मार्गावर सुरू असलेल्या रस्ते कामामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी आणि नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी प्रशासन व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी व्यक्त करण्यात आली. रस्त्याचे काम निर्धारित मुदतीत पूर्ण झाल्यास कोळखे, डेरवली, कोन आणि परिसरातील नागरिकांसह वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Palaspe Phata)