मुंबई : ( Mumbai Ganeshotsav DJ Laser Guidelines 2026 )
मुंबईत डीजे-लेझरला आळा; गणेश मंडळांना पोलिसांचे आवाहन
मुंबई :
राज्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजेच्या कर्णकर्कश आवाजावरून सुरू झालेल्या चर्चेला आता मुंबईतही वेग आला आहे. मुंबईतही गणेशोत्सव मंडळांनी ध्वनिमर्यादेचे पालन करावे आणि लेझर लाईट्सचा वापर टाळावा, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या उपस्थितीत गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. मंडळांनीही नियमांचे पालन करण्याची भूमिका व्यक्त केली आहे.
गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था, गर्दीचे नियोजन आणि विसर्जन मिरवणुका सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिस आणि गणेश मंडळांमध्ये समन्वय ठेवण्यावर बैठकीत भर देण्यात आला. ( Mumbai Ganeshotsav DJ Laser Guidelines 2026)
दरम्यान, मुंबईत डीजे आणि लेझरच्या वापराबाबत चर्चा सुरू असतानाच नवी मुंबई पोलिसांनी मात्र अधिक कठोर भूमिका घेतली आहे. गणेशोत्सवात डीजे आणि लेझर बीम लाईटच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळे, डीजे चालक आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. ( Mumbai Ganeshotsav DJ Laser Guidelines 2026 )
या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव ‘डीजेचा दणदणाट की पारंपरिक वाद्यांचा निनाद?’ या चर्चेभोवती रंगण्याची शक्यता आहे. मुंबईतील काही गणेशोत्सव मंडळांनीही डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्याची भूमिका घेतली आहे. ( Mumbai Ganeshotsav DJ Laser Guidelines 2026 )
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.