मुंबई (Illegal Beef Transport) : हिंदूंचे पवित्र सण-उत्सव आले की धर्मांध मुस्लिमांकडून गालबोट लावण्याचे दुर्दैवी प्रयत्न पुन्हा एकदा समोर आले आहेत. ज्या भगवान श्रीकृष्णाने आयुष्यभर गोमातेचे रक्षण अन् पूजन केले, त्याच श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पवित्र पर्वावर राज्यात विविध ठिकाणी गोमांस तस्करी अन् बेकायदेशीर गोवंश वाहतुकीचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले. या प्रकारामुळे संपूर्ण राज्यभरातील हिंदुत्ववादी संघटना आणि गोरक्षकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
नाशिक, सावंतवाडी, वडपे (भिवंडी) आणि तळोजा यांसारख्या विविध महत्त्वाच्या ठिकाणी गोरक्षकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि सतर्कतेमुळे गोमांसाची मोठी खेप आणि अनेक गोवंश ताब्यात घेण्यात आले आहेत. संशयास्पद वाहनांचा पाठलाग करून गोरक्षकांनी बेकायदेशीरपणे चाललेली गोवंशाची व गोमांसाची वाहतूक रोखली आणि आरोपींना तात्काळ पोलिसांच्या स्वाधीन केले. सणासुदीच्या काळात हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याच्या हेतूनेच हा प्रकार घडवून आणल्याचा आरोप केला जात आहे.
गोमाता हे हिंदू संस्कृतीचे श्रद्धास्थान असताना अशा प्रकारे सणांच्या दिवशीच गोमांसाची तस्करी करणाऱ्या धर्मांधांवर आणि त्यांच्या पाठीशी असलेल्या मुख्य सूत्रधारांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी आक्रमक भूमिका हिंदुत्ववादी संघटनांनी घेतली आहे. गोरक्षकांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे की, जर धर्मांध जिहादी गोतस्करांवर कठोर कारवाई करण्यात आली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. सध्या पोलीस या सर्व प्रकरणांचा कसून तपास करत आहेत. (Illegal Beef Transport)
सावंतवाडीतून २४ किलो गोमांस जप्त
सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून हद्दपार केलेल्या एका गुन्हेगाराने बेकायदेशीरपणे गोमांसाची वाहतूक केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी सावंतवाडी येथे उघडकीस आला. सावंतवाडी पोलिसांनी गोमांसासह दुचाकी, लोखंडी कोयत्यासह एकूण १ लाख १७ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी मोहम्मद सरफराज बहुउद्दीन ख्वाजा याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी सायंकाळी त्यांने सावंतवाडीत प्रवेश केला आणि सायंकाळी गोमांसाची विक्री करताना आढळून आला. त्याने आपल्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये २४ किलोहून अधिक वजनाचे गोमांस भरले होते. त्यामुळे आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा, शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (Illegal Beef Transport)
तळोजात ६ गोवंशाची कसायाच्या तावडीतून सुटका
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तळोजा गावातील नुमानिया मशीद परिसरात काही गोवंश आढळून आले. स्थानिक गोरक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण ६ गोवंशाना इन्जेक्शन देऊन त्यांना कत्तलीकरीता तयार केले जात होते. तळोजा गावातल्या मुस्लिम बहुल परिसरातील काही धर्मांध मुस्लिम यामध्ये सामील आहेत. बैलगाडीला बैल जुंपून त्यावरून कलिंगड किंवा अन्य फळांची विक्री केली जाते, मात्र बैलगाडीच्या नावाखाली बैलांना जुंपण्याचा धर्मांधांचा हेतू काही वेगळाच असतो. नुमानिया मशीद परिसरात आढळलेली एक बैलगाडी सुद्धा मोडकळीस आलेल्या स्वरूपात आढळून आली आहे. गोरक्षकांच्या मते रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या गुरांना इंजेक्शन देऊन त्यांना गाड्यांमध्ये भरून आणले जाते. त्यानुसार, एकूण ६ बैल तळोजामध्ये कत्तलीसाठी नेणार असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी व्हायरल झालेल्या एका व्हिडिओनुसार, या परिसतामध्ये कसायांनी पूर्ण सेटअप लावल्याचे दिसून येईल. ज्यामध्ये गोमांस अडकवण्यासाठीचे लोखंडी सुळे बसवण्यात आले आहेत. स्थानिक गोरक्षकांनी केलेल्या आरोपांनुसार सुफियान मुल्लाह यामागील मुख्य सुत्रधार असून त्याच्यावर कठोर कारवाई होऊन अटक व्हायला हवी. (Illegal Beef Transport)
भिवंडी येथे कोथिंबीरीच्या जुडीखाली लपवले गोमांस
गाडीतील गोमांस कोणाच्याही दृष्टीस पडू नये यासाठी कोथिंबीरीच्या जुड्या पसरवून अत्यंत शिताफीने चाललेला तस्करीचा प्रकार भिवंडीतील वडपे भागात उघडकीस आला आहे. संशयास्पद वाटणाऱ्या या वाहनाची तपासणी केली असता, त्यात तब्बल तीन वेगवेगळ्या नंबरप्लेट आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार चव्हाट्यावर आला असून, आरोपी इम्तियाज याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. प्राथमिक चौकशीदरम्यान, सदर गाडी ही रमेश गोसावी याच्या मालकीची असल्याचे आरोपीने सांगितले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून तस्करीचे हे नेटवर्क उध्वस्त करण्यासाठी कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
मालेगावात २५ गोवंशांनी भरलेला एक ट्रक ताब्यात
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जाणाऱ्या गोवंशाची सुटका प्राणीन फाऊंडेशनच्या काही कार्यकर्त्यांनी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २५ गोवंशांनी भरलेला एक ट्रक कत्तलीच्या उद्देशाने मालेगावकडे नेल्या जात असल्याची माहिती प्राणीन फाऊंडेशनला मिळाली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी सुमारे २० किलोमीटर ट्रकचा पाठलाग केला. अखेर नांदगाव फाटा, मालेगाव येथे वाहन पकडण्यात यश आले. या घटनेत वाहनासोबत असलेल्या एका हेल्परला ताब्यात घेण्यात आले असून वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाल्याचे सांगण्यात येते आहे. वाहनातील गोवंश 'गोवंश रक्षा समिती, निळगव्हाण'चे सुभाष मालू यांच्या गोशाळेत पालनपोषणासाठी पाठवण्यात आले आहेत.
वराह जयंती येतेय हे विसरू नका!
राज्यामध्ये गोवंश हत्या बंदी कायदा लागू आहे. कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी या दृष्टीकोनातून महायुती सरकार कटीबद्ध आहे. मात्र जिहाद्यांना आमच्या प्रत्येक हिंदू सणांना गालबोट लावायचेच असेल, तर लवकरच वराह जयंतीसुद्धा येतेय, हे त्यांनी लक्षात ठेवावे. गोरक्षकांना सुरक्षित ठेवण्यासाठी सकार सक्षम आहेच. गोरक्षकांकडे कोणी वाकड्या नजरेने पाहत असेल तर त्याला कडक शिक्षा दिल्याशिवाय आमचे सरकार गप्प बसणार नाही.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक