३० वर्षांनंतरही घोडबंदर रोडचे खोदकाम संपेना; महापालिका आयुक्त मनोहर डुंबरे यांनी मांडली व्यथा!

    05-Sep-2026
 
ठाणे : (Ghodbunder Road Traffic) घोडबंदर रोडवर गेल्या सुमारे तीन दशकांपासून विविध विकासकामांसाठी सातत्याने खोदकाम सुरू असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्ता रुंदीकरण, सर्व्हिस रोड, मेट्रो प्रकल्प आणि आता प्रस्तावित रिंग मेट्रोसाठी होणारे काम यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडी आणि प्रवाशांच्या अडचणी वाढल्याची व्यथा भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी व्यक्त केली.
 
ठाणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त टी. चंद्रशेखर यांच्या कार्यकाळापासून घोडबंदर रोड परिसरात रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांसाठी खोदकाम सुरू असल्याचा उल्लेख डुंबरे यांनी केला. रस्ता रुंदीकरणानंतर सर्व्हिस रोडसाठी पुन्हा खोदकाम करण्यात आले. मेट्रो प्रकल्पामुळे नागरिक आधीच त्रस्त असताना, आता काही ठिकाणी सर्व्हिस रोड काढून पुन्हा रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. (Ghodbunder Road Traffic)
 
“तीन दशकांनंतरही घोडबंदर रोड खोदण्याचे काम सुरूच आहे. ही कामे नेमकी कधी पूर्ण होणार?” असा सवाल डुंबरे यांनी केला. प्रस्तावित रिंग मेट्रोसाठी आता अंतर्गत रस्तेही खोदले जात असल्याने नागरिकांच्या दैनंदिन प्रवासावर परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले. (Ghodbunder Road Traffic)
 
ठाणे शहरात राबविण्यात येत असलेल्या अंतर्गत मेट्रो प्रकल्पाची माहिती खासदार, आमदार आणि नगरसेवकांना देण्यासाठी ठाणे महापालिका मुख्यालयात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत डुंबरे यांनी घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी, प्रकल्प नियोजन आणि स्थानिक नागरिकांच्या अडचणी याकडे लक्ष वेधले. (Ghodbunder Road Traffic)
 
हिरानंदानी इस्टेट आणि ब्रह्मांड परिसरात मेट्रो प्रकल्पासाठी रस्त्यालगतची झाडे तोडण्याचे काम सुरू असल्याचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला. आझादनगर येथे मेट्रो स्थानक प्रस्तावित असले, तरी तेथील बाधितांचे सर्वेक्षण अद्याप पूर्ण झालेले नसल्याचा दावा त्यांनी केला. सर्वेक्षण पूर्ण न होता बाधितांचे पुनर्वसन कसे आणि कुठे केले जाणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. (Ghodbunder Road Traffic)
 
यावर महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी बाधितांना घरभाडे दिले जाईल किंवा भाडेतत्त्वावर पर्यायी घरे उपलब्ध करून दिली जातील, अशी माहिती बैठकीत दिल्याचे सांगण्यात आले. (Ghodbunder Road Traffic)
 

 




संबंधित मजकूर