मुंबई (Nepal Flood Missing Persons) : नेपाळमध्ये झालेल्या भीषण महापुरानंतर अद्याप बेपत्ता असलेल्या व्यक्तींची ओळख पटविण्यासाठी भारताने विशेष डिएनए प्रोफाइलिंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेमुळे भारतात राहणारे पात्र प्रथम श्रेणीतील नातेवाईक नियुक्त फॉरेन्सिक प्रयोगशाळांमध्ये जैविक नमुने देऊ शकतील. तयार होणारे डीएनए प्रोफाइल नेपाळ पोलिसांकडे पाठविले जाईल आणि ते अज्ञात मृतदेहांमधून मिळालेल्या डिएनए नमुन्यांशी जुळवून पाहिले जाईल.(Nepal Flood Missing Persons)
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, नेपाळमधील आपत्तीनंतर अद्याप बेपत्ता असलेल्या व्यक्तींचे वडील, आई, मुलगा, मुलगी किंवा भाऊ-बहिण हे प्रथम श्रेणीतील नातेवाईक भारतातील नियुक्त प्रयोगशाळांमध्ये डीएनए नमुने देऊ शकतात. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे नेपाळमध्ये सापडलेल्या, पण अद्याप ओळख पटू न शकलेल्या मृतदेहांची वैज्ञानिक पद्धतीने ओळख निश्चित करण्यासाठी नेपाळच्या प्रयत्नांना मदत करणे हा आहे.(Nepal Flood Missing Persons)
मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळ पोलिसांनी ओळख पटविण्यासाठी ऑटोसोमल एसटीआर डीएनए प्रोफाइलिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्याची शिफारस केली आहे. या प्रक्रियेनुसार भारतातील पात्र नातेवाईक नियुक्त प्रयोगशाळेत डीएनए नमुना देतील. प्रयोगशाळा त्यांचे डीएनए प्रोफाइल तयार करेल. आवश्यक प्राथमिक माहितीसह हे प्रोफाइल नेपाळ पोलिसांच्या डीएनए समन्वय कक्षाकडे पाठविले जाईल. त्यानंतर अज्ञात मृतदेहांमधून मिळालेल्या आनुवंशिक नमुन्यांशी त्याची तुलना केली जाईल. डीएनए जुळल्यास संबंधित मृतदेह किंवा अवशेष कोणत्या बेपत्ता व्यक्तीचे आहेत, हे निश्चित करता येईल. काठमांडूमधील भारतीय दूतावास संपूर्ण प्रक्रियेत भारतीय आणि नेपाळी अधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधणार आहे. कुटुंबीयांना त्यांच्या डीएनए प्रोफाइलची प्रत दूतावासाच्या पूर सहाय्य संपर्क केंद्रालाही पाठविण्याची सुविधा देण्यात आली आहे.(Nepal Flood Missing Persons)
कोणत्या प्रयोगशाळांमध्ये सुविधा उपलब्ध?
केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा (सीएफएसएल)
राज्य न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा (एसएफएसएल)
राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाच्या (एनएफएसयू) प्रयोगशाळा
आवश्यक डीएनए प्रोफाइलिंग क्षमता असलेल्या एनएबीएल मान्यताप्राप्त प्रयोगशाळा
कुटुंबीयांना ही सुविधा सहज उपलब्ध व्हावी यासाठी केंद्र सरकारने संबंधित प्रयोगशाळांची यादी आणि संपर्क तपशीलही जारी केले आहेत.
हजारो जण अद्याप बेपत्ता
दि. २६ ऑगस्ट रोजी झालेल्या भीषण पुरानंतर नेपाळमध्ये शोध, बचाव आणि ओळख पटविण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.(Nepal Flood Missing Persons)
नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम कमीकरण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार
१,२५९ जणांचा मृत्यू
४,२१६ जण अद्याप बेपत्ता
१२ हजारांहून अधिक नागरिकांची सुटका
या भीषण आपत्तीत अनेक मृतदेह गंभीररीत्या विद्रूप झाले असून त्यांच्याजवळील ओळखपत्रे किंवा वैयक्तिक वस्तू वाहून गेल्यामुळे पारंपरिक पद्धतीने ओळख पटविणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत डीएनए प्रोफाइलिंग ही वैज्ञानिक आणि विश्वासार्ह ओळख पटविण्याची महत्त्वाची पद्धत ठरत आहे.(Nepal Flood Missing Persons)
तिबेटलाही मोठा फटका
ही आपत्ती नेपाळ-तिबेट सीमेवरील हिमनदीजवळ झालेल्या बर्फ-खडकाच्या प्रचंड दरडीमुळे निर्माण झाली. त्यामुळे उत्तरी आणि मध्य नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणावर पूर आणि विध्वंस झाला. चिनी सरकारी माध्यमांच्या माहितीनुसार, तिबेटमध्येही २१ जणांचा मृत्यू झाला असून ५४१ जण बेपत्ता आहेत. नेपाळ आणि तिबेटमधील आकडेवारी एकत्रित धरल्यास या आपत्तीत आतापर्यंत १,२८० जणांचा मृत्यू झाला असून ५,६२४ जण अद्याप बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. शोधमोहीम आणि ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू असताना भारताने उपलब्ध करून दिलेली डीएनए प्रोफाइलिंग सुविधा आपल्या बेपत्ता नातेवाईकांच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक कुटुंबांसाठी आशेचा किरण ठरू शकते. (Nepal Flood Missing Persons)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक