मुंबई,(Bajirao Peshwa Birth Anniversary): मराठा साम्राज्याचे सेनानी, रणनितीज्ञ आणि कुशल प्रशासक श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या जन्मदिनानिमित्त राज्यातील सहा महसुली विभागांमध्ये ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच महाराष्ट्रातील १२ गड-दुर्गांना युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभर ‘दुर्गोत्सव-२०२६’ हा उपक्रम राबवण्याचा येणार आहे. गुरुवारी, सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला. (Bajirao Peshwa Birth Anniversary)
सहा महसुली विभागांमध्ये होणाऱ्या ‘पराक्रम दिवस’ या कार्यक्रमात प्रतिमा पूजन, अभिवादन, पराक्रम दिवसाची शपथ, इतिहासतज्ज्ञांची व्याख्याने, शौर्यगाथा सादरीकरण, पोवाडा, शाहिरी, निबंध व वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा, चित्रकला व रांगोळी स्पर्धा, पुस्तक व छायाचित्र प्रदर्शन तसेच दुर्गसंवर्धन आणि स्वच्छता अभियान आयोजित करण्यात येणार आहे. हे कार्यक्रम संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयांच्या समन्वयाने घेण्यात येतील. (Bajirao Peshwa Birth Anniversary)
तर, दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गड-दुर्गांच्या प्रतिकृती तयार करण्याच्या लोकपरंपरेला प्रोत्साहन देणे, दुर्गसंवर्धनाबाबत जनजागृती करणे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून जागतिक विक्रम प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणे, हा दुर्गोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे. (Bajirao Peshwa Birth Anniversary)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....