मुंबई (Political boycott of American Hindu): राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथील महत्त्वपूर्ण कार्यक्रमानंतर अमेरिकेत एक नवा वाद निर्माण झाल्याचे दिसते आहे. हिंदू अमेरिकन पॉलिटिकल एक्शन कमिटी (हिंदू अमेरिकन पीएसी) ने इशारा देत असा आरोप केला आहे की, अमेरिकेतील जवळपास १०० राजकीय नेत्यांनी हिंदू अमेरिकन व्यक्तींकडून कोणत्याही प्रकारच्या राजकीय देणग्या स्वीकारणार नाहीत, अशी प्रतिज्ञा केली असून, त्यासाठी हिंदू दात्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडून लक्ष्य केले जात आहे. समितीने म्हटले की, काही कट्टर डाव्या विचारसरणीच्या संघटनांकडून, ज्यांचा हिंदूविरोधी मोहिमांचा इतिहास आहे, राजकीय उमेदवारांवर दबाव आणला जात आहे.(Political boycott of American Hindu)
हिंदू अमेरिकन पीएसीच्या निवेदनानुसार, हा निर्णय संघाला लोकशाहीविरोधी ठरविण्याच्या नावाखाली घेतला गेला असला, तरी प्रत्यक्षात तो हिंदू अमेरिकन समाजाला लक्ष्य करणारा आहे. समितीने म्हटले की, हिंदू अमेरिकनांना चांगले ठाऊक आहे की, अमेरिकेतील जवळपास सर्व प्रमुख हिंदू मंदिरे, धार्मिक परंपरा आणि मुख्य प्रवाहातील हिंदू संघटनांवर नियमितपणे असा आरोप केला जातो की त्यांची निष्ठा भारत सरकार किंवा संघासारख्या भारतस्थित संस्थांकडे आहे. अशा आरोपांचा उद्देश त्यांना गप्प बसवणे आणि भयभीत करणे हा असतो.(Political boycott of American Hindu)
समितीने अमेरिकेतील प्रत्येक हिंदू नागरिकाला या यादीची तपासणी करण्याचे आवाहन केले आहे. ज्या राजकीय नेत्यांनी या प्रतिज्ञेवर स्वाक्षरी केली आहे, त्यांना आर्थिक योगदान देणे थांबवावे आणि या मोहिमेचा सार्वजनिकपणे निषेध करण्याची मागणी करावी, असेही समितीने म्हटले आहे. हिंदू अमेरिकन पीएसीने आरोप केला की, ही भूमिका अमेरिकन हिंदूंना राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी निष्ठेची परीक्षा देण्यास भाग पाडते, जे भेदभावपूर्ण आहे.(Political boycott of American Hindu)
समितीने आपल्या निवेदनात म्हटले की, अमेरिकन हिंदूंना आपण राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्यास पात्र आहोत हे सिद्ध करण्याची जबाबदारी लादणे हे अत्यंत भेदभावपूर्ण आहे आणि ते ज्यू समाजाविरोधात वापरल्या गेलेल्या पूर्वग्रहदूषित आरोपांची आठवण करून देते. समितीने हिंदू अमेरिकनांना जागरूक राहण्याचे, परंतु निर्भयपणे उभे राहण्याचे आवाहन केले.(Political boycott of American Hindu)
देणग्या नाकारल्यास तातडीने माहिती द्या
कोणत्याही राजकीय प्रचार कार्यालयाने संघाशी संबंध असल्याच्या आधारहीन आरोपांवरून हिंदू अमेरिकनांकडून देणगी स्वीकारण्यास नकार दिल्यास त्याची त्वरित माहिती देण्याचे आवाहन समितीने केले आहे. समितीने अशा उमेदवारांची नावेही प्रसिद्ध केली असून, 'हे ते राजकीय उमेदवार आहेत ज्यांनी हिंदू अमेरिकन देणगीदारांना लक्ष्य करणाऱ्या अभूतपूर्व पत्रावर स्वाक्षरी केली आहे', असे म्हटले आहे.(Political boycott of American Hindu)
काही उमेदवार निर्णयाचा फेरविचार करत असल्याचा दावा
समितीने असा दावा केला की, काही उमेदवारांना या पत्राच्या स्वरूपाबाबत दिशाभूल करण्यात आली असून ते आता आपल्या निर्णयाचा फेरविचार करत आहेत. भारतीय वंशाचे अमेरिकन काँग्रेस सदस्य रो खन्ना आणि डेमोक्रॅटिक उमेदवार डॉ. अब्दुल एल-सय्यद यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही समितीने केली आहे. या दोघांची नावेही स्वाक्षरीदारांच्या यादीत असल्याचे म्हटले आहे. याशिवाय समितीने असा दावाही केला की, या पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या फेडरल उमेदवारांपैकी जवळपास दोन-तृतीयांश उमेदवार आता निवडणुकीतच नाहीत, कारण ते प्राथमिक निवडणुकांमध्ये पराभूत झाले आहेत. यावरून या मोहिमेमागील संघटना हिंदू आणि भारतीय-अमेरिकन नागरिकांना राजकारणापासून दूर ठेवण्यासाठी किती पुढे जाऊ शकतात, असा आरोप समितीने केला आहे.(Political boycott of American Hindu)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक