'प्रहार'चा ट्रेलर प्रदर्शित , उज्ज्वल निकमांची भूमिका साकारणार राजकुमार राव; मराठमोळा अभिनेता ललित प्रभाकर अजमल कसाबच्या भूमिकेत दिसणार !

    30-Sep-2026

prahar
 
मुंबई - Rajkummar Rao ujjwal nikamअभिनेता राजकुमार राव सध्या त्याच्या आगामी 'प्रहार' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. निर्मात्यांनी चित्रपटाचा ट्रेलर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदर्शित केला असून चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. चित्रपटात मराठमोळा अभिनेता ललित प्रभाकर अजमल कसाबच्या भूमिकेत दिसणार आहे.
आगामी 'प्रहार' या चित्रपटात राजकुमार रावने वकील उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारली आहे, ज्यांनी २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार कसाबला फाशीची शिक्षा मिळावी यासाठी अथक लढा दिला होता. हीच कथा आता मोठ्या पडद्यावर साकारली जाणार आहे.Rajkummar Rao ujjwal nikam
ट्रेलरमध्ये २६/११ चे हल्ले दाखवण्यात आले आहेत. २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर अजमल कसाबविरुद्धच्या खटल्यात उज्ज्वल निकम यांनी सरकारचे प्रतिनिधित्व केले होते. आपल्या लढ्यात त्यांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. चित्रपटात वामिका गब्बी आणि जयदीप अहलावत यांचीही प्रमुख भूमिका आहे.Rajkummar Rao ujjwal nikam
 




संबंधित मजकूर