तरुणांच्या संशोधनातून महाराष्ट्र बनेल जगाचे ‘इनोव्हेशन हब’ -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

         
 
 Maharashtra Innovation Hub
 
मुंबई (Maharashtra Innovation Hub): स्टार्टअपची संख्या आणि त्यांच्या क्रियान्वयनात महाराष्ट्र देशाची स्टार्टअप राजधानी ठरला असून, तरुणांचे संशोधन आणि नवकल्पनांच्या बळावर महाराष्ट्र भविष्यात जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. (Maharashtra Innovation Hub)
 
एनसीपीए येथील जमशेद भाभा सभागृहात गेट्स फाउंडेशन आणि समग्र संस्थेच्या समन्वयाने आयोजित ‘द गव्हर्नन्स चॅलेंज’ स्पर्धेच्या चौथ्या आवृत्तीतील विजेत्यांना फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी मुख्य सचिव राजेश अग्रवाल आणि ‘मित्रा’चे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य दीपक करंजीकर उपस्थित होते. (Maharashtra Innovation Hub)
 
फडणवीस म्हणाले, ही केवळ स्पर्धा नसून भविष्यातील प्रशासनाला दिशा देणाऱ्या प्रतिभा आणि कल्पना शोधण्याचा उपक्रम आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा विश्लेषण, डिजिटल प्रशासन, शहरीकरण, कृषी, आरोग्य, शिक्षण, हवामान बदल आणि नवोन्मेष या क्षेत्रांत तरुणांचा दृष्टिकोन प्रशासनात आणण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. (Maharashtra Innovation Hub)
 
नागपूर, नाशिक, कोल्हापूर, नांदेड, अमरावतीसह राज्याच्या प्रत्येक भागातील युवा संशोधकांना मार्गदर्शन, तंत्रज्ञान, इन्क्युबेशन आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची गरज आहे. कल्पनेपासून प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि जागतिक विस्तारापर्यंतची संपूर्ण नवोन्मेष साखळी महाराष्ट्रात उभारली जात आहे, असेही त्यांनी सांगितले. (Maharashtra Innovation Hub)
 
देशातील एकूण स्टार्टअपपैकी १८ टक्के महाराष्ट्रात असून राज्यात ३० हजारांहून अधिक स्टार्टअप आहेत. नवी मुंबईत ३०० एकर क्षेत्रावर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ‘इनोव्हेशन सिटी’ उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२६ अंतर्गत दोन लाख युवक व व्यावसायिकांना प्रशिक्षण देण्यात येणार असून एआय इन्क्युबेटर्सही स्थापन केले जातील. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी शासन, उद्योग आणि बाजारपेठेने समन्वयाने काम केल्यास नवोन्मेषाला मोठी चालना मिळेल, असे सांगितले. (Maharashtra Innovation Hub)
 
स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहा संघांनी आरोग्य, कृषी, शिक्षण, वित्त, प्रशासनातील नवोन्मेष आणि शहरी विकास या विषयांवर सादरीकरण केले. प्रथम क्रमांकाचे पाच लाखांचे पारितोषिक शहरी विकासावरील कल्पनेसाठी मास्टर्स युनियन स्कूल ऑफ बिझनेसच्या अंकिता शिर्के, सिद्धार्थ राजपाल आणि गुरुप्रसाद शेट्टी यांच्या संघाने पटकावले. द्वितीय तीन लाखांचे पारितोषिक शिक्षणावरील सादरीकरणासाठी इंडियन स्कूल ऑफ बिझनेसच्या आरीशा बटाला, तरण पुरी आणि ऋतिक जैन यांना, तर तृतीय एक लाखांचे पारितोषिक आयआयएम मुंबईच्या शुभम पाटील, वरुण दामले आणि संहिता म्हात्रे यांच्या आरोग्यविषयक सादरीकरणाला मिळाले. (Maharashtra Innovation Hub)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर