‘धकधक गर्ल’चा साडीतील देखणा अंदाज! माधुरी दीक्षितच्या ‘कोण होणार करोडपती’च्या चित्रीकरणाला सुरुवात !

    30-Sep-2026
 
mdhuri
 
 
 
 
मुंबई - Madhuri Dixit Sony Marathiमाधुरी दीक्षितची एंट्री म्हटली की सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळणारच! ‘कोण होणार करोडपती’च्या चित्रीकरणाच्या पहिल्या दिवशीही तिचा असाच देखणा अंदाज पाहायला मिळाला. साडीतील मोहक रूप आणि चेहऱ्यावरचे प्रसन्न हास्य घेऊन या ‘धकधक गर्ल’ने सूत्रसंचालिका म्हणून आपल्या नव्या प्रवासाला सुरुवात केली.
चित्रीकरणाच्या पहिल्या दिवसाच्या या फोटोंमधून माधुरीच्या नव्या भूमिकेची झलक पाहायला मिळत आहे. तिचं मनमोहक हास्य आणि सहजसुंदर वावर यामुळे या फोटोंवरून नजर हटवणं कठीण होऊन जातं. सूत्रसंचालिकेच्या खुर्चीत विराजमान होण्यासाठी सज्ज झालेल्या माधुरीचा हा अंदाज चाहत्यांसाठी नक्कीच खास ठरणार आहे.Madhuri Dixit Sony Marathi
अभिनय आणि नृत्याने प्रेक्षकांची मनं जिंकणारी माधुरी आता आपल्या मातृभाषेत, मराठीतून स्पर्धकांशी संवाद साधणार आहे. तिचा आपुलकीचा स्वभाव आणि लोकांशी सहज जुळणारं नातं यामुळे प्रश्नोत्तरांच्या खेळासोबतच गप्पाही तितक्याच रंगतील, अशी अपेक्षा आहे.Madhuri Dixit Sony Marathi
चित्रीकरणाला सुरुवात झाली असून, या पहिल्या झलकांनी माधुरीच्या नव्या भूमिकेबद्दलची उत्सुकता वाढवली आहे. ‘कोण होणार करोडपती’ १२ ऑक्टोबरपासून सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर पाहता येणार आहे.Madhuri Dixit Sony Marathi




संबंधित मजकूर