मुंबई (Kia Carens CNG): किया इंडिया या देशातील आघाडीच्या मास-प्रीमियम ऑटोमेकर कंपनीने आज कॅरेन्स सीएनजी आणि कॅरेन्स क्लॅव्हिस सीएनजीच्या किमतींची घोषणा केली. यामुळे कंपनीचा मल्टि-पॉवरट्रेन पोर्टफोलिओ अधिक दृढ झाला आहे, तसेच ग्राहकांना त्यांच्या विविध गतीशीलता गरजांनुसार अधिक पर्याय उपलब्ध झाले आहेत. १,२११,८०० रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होणाऱ्या या नवीन फॅक्टरी-फिटेड सीएनजी व्हेरियंट्समध्ये कियाच्या थ्री-रो (तीन रांगांच्या) पोर्टफोलिओची उपयुक्तता व वैविध्यतता आणि सीएनजी मोबिलिटीची सोय व कार्यक्षमता यांचे उत्तम संयोजन आहे. (Kia Carens CNG)
कॅरेन्स आणि कॅरेन्स क्लॅव्हिसमध्ये सीएनजी पर्यायांचा समावेश केल्याने सीएनजी मोबिलिटीशी जोडलेली दैनंदिन उपयुक्तता व कार्यक्षमता कियाच्या थ्री-रो पोर्टफोलिओमधील एैसपैस जागा, आरामदायीपणा आणि वैविध्यतता वैशिष्ट्यांशी जोडली जाते. फॅक्टरी-फिटेड स्वरूपात सीएनजी सिस्टीम समाविष्ट करून कियाचा ग्राहकांना दैनंदिन शहरी प्रवासासाठी, तसेच कौटुंबिक प्रवासाच्या गरजांसाठी अत्यंत सोयीस्कर आणि विश्वासार्ह मालकीचा अनुभव देण्याचा मनसुबा आहे. (Kia Carens CNG)
या घोषणेबाबत मत व्यक्त करत किया इंडियाचे मार्केटिंग अँड सेल्सचे सीनियर व्हाईस प्रेसिडेंट श्री. अतुल सूद म्हणाले, “भारत वैविध्यपूर्ण बाजारपेठ आहे, जिथे ग्राहकांच्या प्रवासाच्या गरजा वेगवेगळ्या आहेत आणि ग्राहकांच्या जीवनशैलीला व वापराला सर्वोत्तम अनुकूल ठरेल अशी पॉवरट्रेन उपलब्ध करून देणे हा आमचा दृष्टिकोन आहे. कार्यक्षम आणि व्यावहारिक मोबिलिटी सोल्यूशन शोधणाऱ्या अधिकाधिक ग्राहकांसाठी सीएनजी हा अजूनही महत्त्वाचा पर्याय ठरत आहे. कॅरेन्स आणि कॅरेन्स क्लॅव्हिसवर फॅक्टरी-फिटेड सीएनजी पर्याय सादर करून आम्ही कियाचा पाठिंबा असलेल्या एकात्मिक उत्पादनाद्वारे या मागणीची पूर्तता करत आहोत. या दोन्ही मॉडेल्सनी एैसपैस जागा, आरामदायीपणा आणि कुटुंब-केंद्रित उपयुक्ततेच्या बाबतीत प्रबळ स्थान निर्माण केले आहे; तसेच सीएनजीच्या समावेशामुळे त्यांचे आकर्षण आणखी वाढेल आणि ग्राहकांना निवडीचे अधिक स्वातंत्र्य मिळेल.” (Kia Carens CNG)
कॅरेन्स आणि कॅरेन्स क्लॅव्हिसमधील फॅक्टरी-फिटेड सीएनजी सिस्टीम वेईकलसोबत एकत्रित करण्यात आली आहे, ज्यामुळे दैनंदिन ड्रायव्हिंगचा सोयीस्कर आणि विश्वासार्ह अनुभव मिळतो. हे सीएनजी कॉन्फिगरेशन दोन्ही मॉडेल्सच्या मूळ उपयुक्ततेवर आधारित असून ग्राहकांना नियमित प्रवासासाठी आणि कौटुंबिक वापरासाठी अतिरिक्त व सक्षम पॉवरट्रेन पर्याय प्रदान करते. (Kia Carens CNG)
या सीएनजी सिस्टीममध्ये ६०-लिटर सीएनजी टँक आहे, जी वेईकलच्या सध्याच्या पॉवरट्रेन आणि रचनेला पूरक ठरेल अशा पद्धतीने डिझाइन करण्यात आली आहे. सीएनजी किट बसवल्यानंतरही यामध्ये स्पेअर टायर (स्टेपनी) कायम ठेवण्यात आले आहे, ज्यामुळे ग्राहकांसाठी दैनंदिन उपयुक्तता आणि सोयीसुविधेची खात्री मिळते. (Kia Carens CNG)
किया कॅरेन्स सीएनजी आणि कॅरेन्स क्लॅव्हिस सीएनजीमध्ये कियाच्या थ्री-रो (तीन रांगांच्या) पोर्टफोलिओची मूळ क्षमता आणि सीएनजी पॉवरट्रेनच्या दैनंदिन उपयुक्ततेचे उत्तम संयोजन आहे. भारतातील आधुनिक कुटुंबांसाठी डिझाइन केलेले हे दोन्ही मॉडेल्स कॅरेन्स आणि कॅरेन्स क्लॅव्हिसचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान कायम राखत एैसपैस जागा, आरामदायीपणा, सोय आणि इंधन कार्यक्षमता यांचा आकर्षक मेळ साधतात. या सीएनजी व्हेरियंट्समध्ये ग्राहक-केंद्रित वैशिष्ट्ये उपलब्ध असतील, जिथे इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये डिस्टन्स टू एम्प्टी (डीटीई) लॉजिक (सीएनजी मोड), सीएनजी फ्युएल चेंज स्विच आणि मोठे १६-इंच फ्रंट डिस्क ब्रेक्स यांचा समावेश आहे, ज्यामुळे दैनंदिन प्रवासासाठी उत्साहवर्धक आणि व्यावहारिक मालकीचा अनुभव मिळतो. (Kia Carens CNG)
जी१.५ ६एमटीवर आधारित किया कॅरेन्स आणि कॅरेन्स क्लॅव्हिस सीएनजीमध्ये फॅक्टरी-फिटेड सीएनजी किट असेल, ज्यामध्ये कियाच्या तीन रांगांच्या मॉडेल्सच्या उपयुक्ततता आणि अतिरिक्त पॉवरट्रेन पर्यायचे संयोजन आहे. कॅरेन्स सीएनजी आणि कॅरेन्स क्लॅव्हिस सीएनजी या दोन्ही व्हेरियंट्समध्ये आर१६ व्हील्स आणि १६-इंच फ्रंट डिस्क ब्रेक्ससह सीएनजी-विशिष्ट इंजिन कॅलिब्रेशन आणि मॉडिफाइड सस्पेंशन देण्यात आले आहे. सीएनजी फ्युएल चेंज स्विच आणि सीएनजी डीटीई लॉजिकसह ४.२-इंच कलर टीएफटी एमआयडी सीएनजीचा अनुभव अधिक उत्साहवर्धक करतात, तर दोन्ही मॉडेल्समधील मॉडिफाइड थर्ड-रो सीट-बॅक फ्रेममुळे रेक्लाइन अँगल सुधारतो आणि प्रवाशांना प्रवासादरम्यान अधिक आराम मिळतो. (Kia Carens CNG)
कॅरेन्स सीएनजी आणि कॅरेन्स क्लॅव्हिस सीएनजीमध्ये स्मार्टस्ट्रीम जी१.५ इंजिन आहे, जे ६एमटी ट्रान्समिशनसह जोडलेले आहे आणि सीएनजी मोडमध्ये ९६ पीएस पॉवर आणि १२३ एनएम टॉर्क निर्माण करते. दोन्ही मॉडेल्समध्ये पेट्रोल इंधन यंत्रणेसह ६०-लिटर सीएनजी टँक बसवण्यात आली आहे, ज्यामुळे ग्राहकांना ड्युअल-फ्युएल कॉन्फिगरेशनची लवचिकता मिळते आणि दैनंदिन प्रवास सुखकर होतो. (Kia Carens CNG)