मुंबई - FICCI Frames 2026 Ekta Kapoorभारताचा मनोरंजन उद्योग प्रेक्षकांच्या बदलत्या आवडीनिवडी, सोशल मीडियाचा वाढता प्रभाव आणि कमी होत असलेले बजेट यांच्याशी जुळवून घेत आहे, आणि यामध्ये निर्माते अधिकाधिक आकर्षक स्वरूप, सहज जुळणारी कथाकथन शैली आणि टेलिव्हिजनच्या पडद्यापलीकडेही चर्चा घडवून आणणाऱ्या आशयावर लक्ष केंद्रित करत असल्याचं मत बालाजी टेलीफिल्म्सची संस्थापक-निर्माती एकता कपूर आणि ऑप्टिमायस्टिक्स एंटरटेनमेंटचे संस्थापक अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विपुल शहा यांनी व्यक्त केलं. 'फिक्की फ्रेम्स २०२६'मधील 'रिॲलिटी टेलिव्हिजन व्यवसायाची उत्क्रांती' या विषयावरील आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी बानीजय एशिया आणि एंडेमोल शाइन इंडियाचे संस्थापक आणि समूह सीईओ दीपक धर, ईवान फिल्म्सचे संस्थापक आणि निर्माते निकुल देसाई उपस्थित होते.
धर म्हणाले की, बिग बॉस आणि खतरों के खिलाडी यांसारख्या प्रस्थापित रिॲलिटी शोंना प्रासंगिक राहण्यासाठी सतत नवनवीन बदल करण्याची गरज आहे. पारंपरिक फॉरमॅटची मूळ ओळख कायम ठेवत, निर्मात्यांनी प्रेक्षकांच्या बदलत्या आवडीनिवडींचा समावेश केला पाहिजे आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधील रूपांतरांमधून शिकले पाहिजे. प्रेक्षक मोठ्या प्रमाणात बदलले आहेत. आपण ज्या प्रकारे कंटेंट पाहतो, त्यातही लक्षणीय बदल झाला आहे," असे धर म्हणाले. तसेच, कंटेंट निर्मितीच्या पद्धतीवर इंडस्ट्रीने पुनर्विचार करण्याची गरज असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले.FICCI Frames 2026 Ekta Kapoor
एकता कपूर म्हणाली, सोशल मीडियाचा प्रभाव वाढतोय. प्रेक्षक अनेकदा संपूर्ण एपिसोड पाहण्यापूर्वी लहान क्लिप्स आणि प्रचारात्मक व्हिडिओ पाहतात. यामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी कार्यक्रमाची सुरुवातीची १०-१५ मिनिटे विशेष महत्त्वाची ठरतात. लाइव्ह स्ट्रीमिंगमुळे देखील सहभागाचा एक नवीन स्तर निर्माण झाला आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना संपादित एपिसोडच्या पलीकडेही स्पर्धकांना फॉलो करणे शक्य होते.FICCI Frames 2026 Ekta Kapoor
एकता पुढे म्हणाली, पूर्वनियोजित दूरचित्रवाणी कार्यक्रमांपेक्षा अनस्क्रिप्टेड मनोरंजन एक वेगळा सर्जनशील अनुभव देते, कारण स्पर्धक परिस्थितीवर कशी प्रतिक्रिया देतील याचा निर्मात्यांना पूर्णपणे अंदाज लावता येत नाही.या फॉरमॅटच्या आकर्षणाचे उदाहरण म्हणून तिने 'लॉक अप' या कार्यक्रमाचा उल्लेख केला, ज्याची ती सह-निर्माती आहे. स्पर्धक जेव्हा प्रत्यक्ष परिस्थितीला प्रतिसाद देतात, तेव्हा निर्माण होणारी अनिश्चितता आणि नाट्यमयता तिने अधोरेखित केली.FICCI Frames 2026 Ekta Kapoor
विपुल शाह यांनी यावेळी 'लाफ्टर शेफ्स'च्या यशाचे श्रेय स्वयंपाक आणि विनोदाच्या मिश्रणाला दिले. स्वयंपाक हा एक संरचित उपक्रम आहे, तर स्पर्धकांमधील संवाद आणि नातेसंबंध विनोद आणि अनियोजित क्षणांसाठी संधी निर्माण करतात. त्यांनी कलाकार निवडीच्या महत्त्वावरही भर दिला आणि सांगितले की, उत्तम विनोदी टायमिंग आणि प्रक्रियेचा आनंद घेण्याची क्षमता असलेले स्पर्धक निवडणे हे विनोदी रिॲलिटी शोच्या यशासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.FICCI Frames 2026 Ekta Kapoor