_202609301918489493_H@@IGHT_350_W@@IDTH_696.jpg)
प्रतिनिधी, मुंबई - FICCI Frames 2026 Ajay Devgnअभिनेता अजय देवगण आणि जिओस्टारचे हिंदी व इंग्रजी मनोरंजन व्यवसाय प्रमुख आलोक जैन यांनी फिक्की फ्रेम्स २०२६ मध्ये त्यांच्या बहुप्रतिक्षित आगामी चित्रपट 'दृश्यम द कन्क्लुजन'बद्दल संवाद साधला. हा थ्रिलर चित्रपट २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. दोघांनी त्यांच्या चित्रपटाबद्दल बोलण्यासोबतच बॉक्स-ऑफिस, कोविडनंतर प्रेक्षकांच्या आवडीनिवडीत झालेले बदल आणि इतर अनेक विषयांवरही चर्चा केली.
अजय देवगण म्हणाला, “मी आंतरराष्ट्रीय किंवा प्रादेशिक सिनेमाचे श्रेय हिरावून घेऊ इच्छित नाही; तिथेही चित्रपट बनवणे तितकेच कठीण आहे, पण मला वैयक्तिकरित्या वाटते की हिंदी चित्रपट बनवणे सर्वात कठीण आहे. तुमचा लक्ष्यित प्रेक्षकवर्ग कोण आहे हे तुम्हाला माहीत नसते. जेव्हा तुम्ही पंजाबी चित्रपट, तेलगू चित्रपट किंवा तमिळ चित्रपट बनवता, तेव्हा तो एका विशिष्ट प्रदेशासाठी बनवलेला असल्यामुळे तुम्हाला प्रेक्षकवर्गाची कल्पना येते. तुम्हाला त्यांची आवड-निवड माहीत असते आणि म्हणूनच, तुम्ही त्यानुसार तुमचा चित्रपट बनवता.FICCI Frames 2026 Ajay Devgn
अजय पुढे म्हणाला, “हिंदी भाषिक प्रदेशांबद्दल बोलायचं झालं तर, दर ८० ते ९० किलोमीटरवर भाषा बदलते. विचारप्रक्रिया बदलते. तुम्हाला सर्वसामान्य आणि उच्चभ्रू प्रेक्षकवर्ग, किंवा शहरी किंवा ग्रामीण केंद्रं, या संकल्पनाही समजून घ्याव्या लागतात. त्यामुळे, एकतर प्रेक्षकांच्या एका वर्गाला ते आवडतं, तर दुसऱ्या वर्गाला ते आवडत नाही. परिणामी, अपेक्षित आकडेवारी मिळत नाही.मात्र, आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीत त्यांना त्यांचे लक्ष्यित प्रेक्षक माहीत असतात. त्यांना माहीत असतं की, ‘ते असा विचार करतात, असे वागतात. त्यामुळे, आपल्याला त्यांच्यासाठी चित्रपट बनवायला हवा’. इथे आपल्याला सगळ्यांनाच लक्ष्य करावं लागतं. तुम्ही प्रत्येकापर्यंत कसं पोहोचणार? म्हणूनच, हिंदी चित्रपट लिहिणं सर्वात कठीण असल्याचं अजय देवगण म्हणाला.FICCI Frames 2026 Ajay Devgn