'दृश्यम द कन्क्लुजन' 'दृश्यम 2'ला मागे टाकेल': अजय देवगणने फिक्की फ्रेम्स २०२६ मध्ये आपल्या आगामी चित्रपटाबद्दल केले भाष्य !

    30-Sep-2026

drushyam
 
 
 
 
 
प्रतिनिधी, मुंबई - Drishyam The Conclusion Ajay Devgnअभिषेक पाठक दिग्दर्शित 'दृश्यम द कन्क्लुजन' या वर्षातील सर्वाधिक प्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात अजय देवगण, तब्बू, श्रिया सरन आणि जयदीप अहलावत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'फिक्की फ्रेम्स २०२६' मध्ये अजय एका पॅनल चर्चेत सहभागी झाला होता. या कार्यक्रमात त्याने 'दृश्यम द कन्क्लुजन'बद्दल बोलताना सांगितले की, त्याने हा चित्रपट पाहिला असून तो 'दृश्यम २' पेक्षाही सरस आहे.
चित्रपटाबद्दल बोलताना अजय म्हणाला, "ज्या प्रकारे पटकथा वेगाने पुढे सरकते ते बघून माझं वैयक्तिक मत आहे की तो '२' पेक्षा चांगला झाला आहे. त्यामुळे, आशा करूया हा चित्रपट पण प्रेक्षकांना आवडेल.Drishyam The Conclusion Ajay Devgn
'दृश्यम' आणि 'दृश्यम २' हे दोन्ही त्याच नावाच्या मल्याळम चित्रपटांचे रिमेक होते. त्यात मोहनलाल यांनी मुख्य भूमिका साकारली होती. पण 'दृश्यम द कन्क्लुजन' ही एक नवीन कथा आहे, तो मल्याळम 'दृश्यम ३' चा रिमेक नाही. 'दृश्यम द कन्क्लुजन' हा चित्रपट २ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.Drishyam The Conclusion Ajay Devgn
 




संबंधित मजकूर