नवी दिल्ली (Developed India Job Creation): विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी देशातील रोजगारनिर्मितीची व्यवस्था अधिक मजबूत करण्याची गरज असून, शिक्षण, कौशल्य, उद्योग आणि स्थानिक रोजगाराच्या संधी यांच्यातील दुवा अधिक भक्कम करण्यावर भर देण्यात आला. नॅशन फर्स्ट पॉलिसी रिसर्च अँड चेंज फाउंडेशनच्या (NFPRC) वतीने नवी दिल्लीतील इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे संसद सदस्य आणि विविध राज्यांतील आमदारांसाठी रोजगारविषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. (Developed India Job Creation)
या कार्यशाळेत लोकसभा, राज्यसभा तसेच विविध राज्यांच्या विधानसभांमधील सुमारे ४० लोकप्रतिनिधी सहभागी झाले. शिक्षण व कौशल्यविकास, गुंतवणुकीच्या माध्यमातून औद्योगिकीकरण, रोजगारनिर्मिती तसेच डिजिटल माध्यमांद्वारे मतदारसंघातील जनतेशी प्रभावी संवाद या विषयांवर यावेळी चर्चा झाली. स्थानिक गरजा लक्षात घेऊन पुराव्यावर आधारित धोरणनिर्मिती आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरजही अधोरेखित करण्यात आली. (Developed India Job Creation)
NFPRC फाउंडेशनचे बोर्ड सदस्य अभिनव प्रकाश यांनी भारताच्या आर्थिक प्रगतीचे रूपांतर स्थानिक पातळीवरील रोजगार आणि आर्थिक संधींमध्ये करण्याची आवश्यकता व्यक्त केली. शिक्षण, कौशल्य आणि उद्योगांच्या गरजा यांच्यातील समन्वय वाढवण्यासोबतच प्रत्येक मतदारसंघातील स्थानिक क्षमता आणि संधींनुसार गुंतवणुकीला चालना देण्याची भूमिका लोकप्रतिनिधींनी बजावावी, असे त्यांनी सांगितले. (Developed India Job Creation)
राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष वासुदेव देवनानी यांनी स्थानिक युवकांची कौशल्ये, क्षमता आणि आकांक्षा यांचा उदयोन्मुख रोजगाराच्या संधींशी मेळ घालण्यावर भर दिला. सरकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे, उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील सहकार्य वाढवणे तसेच स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सक्षम वातावरण निर्माण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. (Developed India Job Creation)
लोकसभा सदस्य शशांक मणी यांनी टियर-२ आणि टियर-३ शहरांमध्ये स्थानिक उद्योजकतेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मितीची क्षमता असल्याचे सांगितले. त्यांनी देवरिया आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये राबविलेल्या ‘अमृत प्रयास’ आणि ‘जागृती’ या उपक्रमांचा उल्लेख केला. उत्पादन, कृषीप्रक्रिया आणि पर्यटनासह विविध क्षेत्रांवर आधारित स्थानिक आर्थिक परिसंस्था विकसित करण्यावर त्यांनी भर दिला. (Developed India Job Creation)
फाउंडेशन फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचे संचालक राहुल अहलुवालिया यांनी निर्यातकेंद्री विकास, उत्पादन क्षेत्रातील गुंतवणूक, पर्यटन आणि व्यवसायासाठी सुलभ वातावरण यांना रोजगारनिर्मितीसाठी महत्त्वाचे ठरवले. स्थानिक अडथळे ओळखून गुंतवणूक आकर्षित करणे आणि परवाने व तपासणी प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले. (Developed India Job Creation)
दरम्यान, संवादतज्ज्ञ डॉ. रोहित उपाध्याय यांनी लोकप्रतिनिधींसाठी डिजिटल आणि सोशल मीडिया संवादावर क्षमता-विकास सत्र घेतले. नागरिकांशी संवाद, सोशल मीडिया विश्लेषण, डिजिटल कंटेंट, चुकीच्या माहितीला आळा घालणे आणि सार्वजनिक संवादात कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदारीने वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. (Developed India Job Creation)