मंगळसूत्रावरून प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना अंकिताचं सडेतोड उत्तर !

    30-Sep-2026
 
ankita
 
मुंबई - Ankita Prabhu Walawalkar कोकण हार्टेड गर्ल अर्थात अंकिता प्रभू वालावलकर तिच्या आक्रमक भूमिकेमुळे सतत चर्चेत असते. तिला ट्रोलकरण्याचा प्रयत्न करणार्यांनाही ती सडेतोड भाषेत उत्तर देते. नुकतंच अंकिताला मंगळसूत्रावरूनट्रोल करण्यात आलं होतं. 'हिचं लग्न झालं की नाही, तिच्या गळ्यात मंगळसूत्र दिसत नाही', अशी कमेंट करुन काहींनी तिला ट्रोल केलं. मंगळसूत्रावरून प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना तिने सडेतोड उत्तर दिलं आहे.
अंकिताने शेअर केलेल्या व्हिडीओत, अगदी मालवणी भाषेत ट्रोलर्सना सणसणीत उत्तर दिलं. अंकिता वालावलकरने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिने मंगळसूत्रावरून प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना मालवणी भाषेत उत्तर दिलं. 'माझं लग्न 16 फेब्रुवारी 2025ला झालं. 2025 पासून असा एकही दिवस नाही की, माझ्या गळ्यात मंगळसूत्र असं नाही. शूटिंग वगैरे असेल तर, आम्ही वेगळं काही तरी घालतो. पण असं कधी घडलेलं नाही. पण तरी सुद्धा, काही बायकांना मंगळसूत्र दिसणार नाही'.Ankita Prabhu Walawalkar
'पोस्टवर त्यांच्या नासक्या कमेंट्स असतात. 'हिच्या गळ्यात मंगळसूत्र नाही दिसत, हिचं लग्न झालं की नाही?'. मला असे कपडे घालायला आवडतात. मला बंद गळ्याचे टीशर्ट घालायला आवडतात. मग असे कपडे घातल्यानंतर गळा खाली करुन दाखवू का? आहे हा मंगळसूत्र, नवऱ्याला कसं मी जपून ठेवलं आहे, असं म्हणू का? आता उद्यापासून मी मोठं मंगळसूत्र घालून फिरते. म्हणजे लोकांना गळ्यातील मंगळसूत्र दिसेल. अरे देवा टिकली पण लावली पाहिजे ना, असं म्हणत अंकिताने ट्रॉलर्सला खडे बोल सुनावले.Ankita Prabhu Walawalkar




संबंधित मजकूर