मुंबई - (Raqesh Bapat Star Pravah )आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा लोकप्रिय अभिनेता राकेश बापट स्टार प्रवाहाच्या ‘तुझ्याकडे तुला मागणे’ या नव्या मालिकेत वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेत राकेश अत्यंत प्रभावी आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व साकारणार आहे. अभिमान सरदेसाई असं त्याच्या पात्राचं नाव असून अतिशय प्रामाणिक, स्वच्छ प्रतिमा असलेला यशस्वी उद्योजक आणि राजकीय नेत्याच्य़ा भूमिकेत राकेश या मालिकेत दिसणार आहे.
नेहमीच आपल्या चोखंदळ भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या राकेशला या मालिकेत बघणं प्रेक्षकांसाठी ट्रीट असणार आहे. कारण बऱ्याच दिवसांनी राकेश छोट्या पडद्यावर पुनरागमन करतोय. मालिकेत इतर कलाकार कोण असणार ? हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलंय. (Raqesh Bapat Star Pravah)