मुंबई(Municipal School Adoption) : शिक्षण क्षेत्रातील नामांकित संस्था, शाळा आणि शिक्षण तज्ज्ञांनी आपल्या परिसरातील किमान एक तरी महापालिका शाळा दत्तक घेऊन तिच्या शैक्षणिक विकासात योगदान द्यावे, असे आवाहन कौशल्य विकास आणि रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांना संबोधित करताना ते बोलत होते.(Municipal School Adoption)
लोढा म्हणाले, "संस्थांनी केवळ स्वतःपुरते मर्यादित न राहता सामाजिक दायित्व निभावले पाहिजे. आर्थिक मदतीपेक्षा तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि आधुनिक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. खासगी शाळांच्या शिक्षकांनी महिन्यातून एकदा पालिका शाळेला भेट देऊन उत्तम शैक्षणिक व व्यवस्थापन पद्धतींची देवाणघेवाण करावी."(Municipal School Adoption)
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात कौशल्य विकासाचे महत्त्व अधोरेखित करताना मंत्री लोढा म्हणाले की, लहान वयापासूनच विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षण दिल्यास त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होईल आणि श्रमाची प्रतिष्ठा वाढेल. शिक्षण हे केवळ परीक्षा, गुण आणि पदवीपुरते मर्यादित नसून संस्कार, संस्कृती आणि मूल्यांची रुजवणूक करणे हेच त्याचे खरे उद्दिष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नवीन शैक्षणिक धोरण 'विकसित भारत'च्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.(Municipal School Adoption)
'ड्रग-फ्री मुंबई'साठी शाळांनी पुढाकार घ्यावा :
विद्यार्थ्यांना व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्यासाठी प्रत्येक शाळेत दोन पालक, दोन शिक्षक आणि समुपदेशक यांची एक समिती स्थापन केली जावी. पालकांनी मुलांना फक्त सुविधा न देता स्वतःचा वेळ आणि प्रेम दिले पाहिजे. 'ड्रग-फ्री मुंबई' ही केवळ सरकारी मोहीम न राहता लोकचळवळ बनली पाहिजे, असे आवाहन मंत्री लोढा यांनी केले.(Municipal School Adoption)