स्वरा खालाची लायकी

    03-Sep-2026   
 
 Swara Bhasker Jauhar
 
दिल्लीतील ‘इंडिया इंटरनॅशनल सेंटर’ येथे ‘वुमन, लाईफ, फ्रीडम’ या विषयांवरच्या एका ‘टॉक शो’मध्ये, खालाजान स्वरा भास्कर हिने एक आठवण सांगितली. "पद्मावती’ सिनेमातला ‘जोहर’ पाहून, माझे अस्तित्व मला शरीरापुरते किंवा योनीपुरतेच मर्यादित असल्याचे जाणवले,” असे ही खालाजान म्हणाली. अगदी बरोबर, स्वराचे अस्तित्व योनीपुरतेच मर्यादित आहे. कारण, महिलेला ‘खेती’ समजणार्‍यांच्या कंपूत ती रममाण आहे. तिला जोहरबद्दल संताप आला. पण, ‘विरे दी वेडिंग’ या चित्रपटात ती जो आनंद मिळवताना दिसली (सिनेमाबद्दल गुगल सर्च करणे), तोच आनंद तिला हलाला, ट्रिपल तलाक, बहुपत्नीत्व, धर्मांधता यांबद्दल वाटत असावा, असेच दिसते.
 
मुस्लीम आक्रांताच्या लिंगपिसाट आणि धर्मांधतेच्या विरोधात ‘जोहर’ पत्करून, मृत्यूला कवटाळणार्‍या सती या भित्र्या होत्या? अर्थात, आता स्वरा म्हणते की, तिच्या म्हणण्याचा अर्थ तसा नव्हता. हिंदू अस्मिता, हिंदू गौर, हिंदू त्यागाबाबत सातत्याने विषवमन करणारी स्वरा भास्कर गँग, सध्या चेकाळलीच आहे. देशविरोधी-समाजविरोधी कारस्थाने करण्याची दुकाने बंद पडली, हे दुःख त्यांना स्वस्थ बसू देत नाही. डुक्कर जसे उकिरडे शोधत फिरते, तसेच स्वराचे आणि तिच्या समअविचारी लोकांचे सध्या वागणे आहे. देश, समाज, परंपरा, धर्म यांना अस्थिर करण्यासाठी कुठे काही होत असेल; तर ही गँग तिथे लगेच पोहोचते. तो उकिरडा फुंकण्यासाठी तडफडतेही. घाणीत लोळत आहेत म्हटल्यावर, त्यांच्याकडून काय पवित्रतेची अपेक्षा करणार? त्यामुळेच स्वरा भास्कर सतत अज्ञानाची आणि भ्याडपणाची गरळ ओकताना दिसते. महाराणी पद्मावती आणि त्या सतींनी ‘जोहर’ पुकारला, कारण गोष्ट केवळ शरीराची नव्हती; तर त्या इस्लामिक आक्रमणकर्त्यांच्या पाशवी आणि क्रूर राक्षसी इच्छेला चिरडून टाकण्याची होती. हिंदू महिलांचे शरीर भोगण्यासाठी आणि अपमानित करण्यासाठी असते, या घाणेरड्या मानसिकतेला ठेचण्यासाठीचाच तो ‘जोहर’ होता. अर्थात, हे स्वरा फहाद अहमदला कधीच समजणार नाही. स्वरा खालाजान, तू तुझ्या त्याच दुनियेत कयामतच्या रात्रीची वाट बघत बस! इतिहासातील हिंदू वीर स्त्रियांच्या त्यागाबद्दल-शौर्याबद्दल बोलण्याची तुझी लायकीच नाही!
 
कुत्रे इमानी असतात
 
काही वर्षांपूर्वी ‘महिला खतना’ या प्रथेविरोधात लेख लिहिला होता. त्यावेळी एक उच्चविद्याविभूषित मुस्लीम भगिनीने वाद घालत म्हटले की, "योनीचा छोटासा भाग कापतो, तर तू विरोधात लिहितेस. मग या तुमच्या बायकांनी तर ‘जोहर’ करत अख्खे शरीरच जाळून घेतले, त्याच्या विरोधात बोल ना!” अर्थात, त्यानंतर इस्लामिक आक्रांत आणि त्यांच्यातल्या काहींची प्रेतासोबत अत्याचार करणारी पाशवी वृत्ती, तसेच महिलांच्या लैंगिक भावना दडपण्यासाठी योनी कापणे आणि धर्मनीतीसाठी सर्वोच्च बलिदान देत केलेला ‘जोहर’ यांची तुलनाच होऊ शकत नाही, याबद्दल तिच्याशी ठामपणे बोलले. (त्यानंतर तिने मला सर्वत्र ब्लॉक केले, हा विषय वेगळा.) तर, हे सगळे आठवले कारण, खाला स्वरा भास्कर हिचे विधान. ती म्हणाली की, "पद्मावती’ सिनेमामध्ये दाखवलेला ‘जोहर’ बघून असे वाटले की, बलात्कारानंतर जिवंत राहणार्‍या महिला भित्र्या आहेत. बलात्कारानंतर पीडितेला जगण्याचा हक्कच नसतो का?”
 
पण, शूर स्त्रियांनी ‘जोहर’ का केला? जिवंत राहिलो, तर मुस्लिमांच्या ‘हरा’मध्ये गुलाम व्हावे लागेल, स्वधर्माविरोधात उभा राहणारा शत्रू स्वतःच्या उदरातून पैदा करावा लागेल; धर्म, समाज, देश सगळ्यांच्या विरोधात आपला वापर होईल, याच भीतीतून शूर स्त्रियांनी जोहर केला. ‘धर्म सोड, नाहीतर जीव घेऊ’ असे म्हटल्यावर, जीव देणारे लाखो लोक या भारतभूमीत झाले. या श्रेणीत स्वराबद्दल तर विचारताच सोय नाही. तिने स्वखुशीने फहाद अहमदशी ‘निकाह’ केला. अर्थात तिची ती आपली आवड आहे. पण, तिला आवडले म्हणून इतिहासातील शौर्यशाली हिंदू स्त्रियांनीही स्वधर्म त्यागून, क्रूर धर्मांधांचे गुलाम आवडीने व्हायला हवे होते का? जगाच्या पाठीवर सर्वोच्च त्याग आणि नीतिमत्ता आणि शौर्याचा इतिहास म्हणजे, या महान स्त्रियांच्या बलिदानाचा इतिहास होय. पण, स्वरा खालाला हे समजणारच नाही. आगंतुकांवर भुंकण्यासाठी कुत्रा पाळणारे काही लोक असतात, तसेच उठसूट हिंदूंच्या प्रथा, परंपरा आणि इतिहासावर भुंकणार्‍यांनाही पाळले जाते की काय, असे वाटते. हो, पण कुत्रे इमानी तरी असतात. स्वरासारख्या लोकांची इमानी कुत्र्यांशी तुलना करणे म्हणजे, कुत्र्यांवरचाच अन्याय ठरेल.
९५९४९६९६३८




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर