मुंबई: पवई आय आय टी तील विद्यार्थी साहिल वाकोडे यांच्या आत्महत्या प्रकरणी आपण निश्चित न्याय मिळवून देऊ . या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे.क्राइम ब्रँच या प्रकरणी चांगला तपास करीत आहे. प्रा. सूर्यनारायण डुल्ला यांना निलंबित केले पाहिजे. दिवंगत विद्यार्थी साहिल वाकोडे ला न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आश्वासन देत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी साहिल वाकोडे यांच्या वडीलांना धीर दिला. (Sahil Wakode Case)
मुंबईत आझाद मैदान येथे दिवंगत साहिल वाकोडे यांना न्याय मिळावा म्हणून त्यांचे आईवडील उपोषण आंदोलन करीत आहेत.त्यांची रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली.त्यावेळी ना.रामदास आठवले यांनी दूरध्वनीहून साहिल वाकोडे यांच्या वडिलांशी चर्चा करून त्यांच्या आंदोलनास रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा जाहीर केला. येत्या दिनांक 3 ऑक्टोबर रोजी दिवंगत साहिल वाकोडे यांच्या आईवडिलांची बांद्रा पूर्व संविधान निवासस्थानी ना. रामदास आठवले यांची भेट होणार आहे अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे प्रसिद्धी प्रमुख हेमंत रणपिसे यांनी दिली आहे. (Sahil Wakode Case)
आज आझाद मैदान येथे दिवंगत साहिल वकोडेला न्याय मिळावा यासाठी त्यांचे आईवडील उपोषण आंदोलन करीत असून त्यांना पाठिंबा देण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली.त्यात रिपाइं चे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे;राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे; सुरेश बार्शिंग; काकासाहेब खंबाळकर; प्रकाश जाधव;बाळासाहेब गरुड; सुनील मोरे; घनश्याम चीरणकर ; प्रवीण मोरे आदी अनेक पदाधिकारी उपस्थित होते. (Sahil Wakode Case)