‘साऊथ ते मराठी’- रवी प्रकाश यांची खाकी वर्दीत मराठीत दमदार एन्ट्री!

    28-Sep-2026
 
 
ravi
 
 
मुंबई - Ravi Prakash South मराठी कलाकार दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपला ठसा उमटवित असताना, दाक्षिणात्य कलाकारांची सुद्धा मराठी चित्रपटात दमदार एन्ट्री होत आहे! प्रसिद्ध तेलगू अभिनेता रवी प्रकाश ‘दशमी’ या आगामी चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असून, आपल्या पहिल्याच चित्रपटात ते डॅशिंग पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. विशेष म्हणजे, मराठीत पदार्पण करताना त्यांनी थेट खाकी वर्दीचा रुबाब दाखवत ‘एसीपी आसिफ मुजावर’ ही रुबाबदार व्यक्तिरेखा साकारली आहे. चित्रपटाचा दमदार पॉवरपॅक्ड असा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
रहस्य, थरार आणि सामाजिक वास्तवाचा वेध घेणाऱ्या ‘दशमी’ चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांचे आहे. केएनके बॉक्स प्रस्तुत 'दशमी' चित्रपट ऑक्टोबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटात अभिनेता महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे, विजय निकम,अभिनेत्री गौरी इंगवले, प्रसन्न केतकर, देवेंद्र गायकवाड, शाम माशाळकर, राज कुंदन असे कलाकार दिसणार आहेत.Ravi Prakash South
आपल्या मराठी पदार्पणाबद्दल रवी प्रकाश म्हणतात, ‘मराठीत पहिल्यांदा काम करताना अशी भूमिका मिळणं माझ्यासाठी खूप खास आहे. ‘एसीपी आसिफ मुजाव’र हा केवळ डॅशिंग पोलीस अधिकारी नाही, तर तपासाची सखोल माहिती असलेला निष्णात अधिकारी आहे. या भूमिकेसाठी माझ्याकडून खूप बारकाईने तयारी करून घेतली गेली. या भूमिकेतून मराठी प्रेक्षकांना माझी एक वेगळी व्यक्तिरेखा पाहता येणार आहे, याचा आनंद आहे.’Ravi Prakash South
डॅशिंग लूक, पोलिसी अंदाज आणि तपासातील बारकावे यामुळे ‘एसीपी आसिफ मुजावर’ ही व्यक्तिरेखा ‘दशमी’च्या कथानकात महत्त्वाची ठरणार आहे. विशेष म्हणजे, मराठीतील पहिल्याच भूमिकेत पोलिस अधिकाऱ्याची दमदार व्यक्तिरेखा साकारत त्यांनी आपले पदार्पण लक्षवेधी केले आहे.Ravi Prakash South
 




संबंधित मजकूर