चित्रपटांच्या नावाखाली परदेशात पैसे पाठवल्याच्या आरोपाखाली रकुलप्रीत, वासू भगनानी, पॅनोरमा स्टुडिओज यांच्यासह अनेक कलाकार आणि कंपन्यांवर आयकर विभागाचा छापा!

    28-Sep-2026
 
 
rakul
 
 
 
प्रतिनिधी, मुंबई - Rakul Preet Singh Vashu Bhagnaniमुंबई आयकर विभागाने बॉलिवूडशी संबंधित अनेक ठिकाणांवर अचानक कारवाई सुरू केल्याने इंडस्ट्रीत एकच खळबळ उडाली आहे. विभागाने अनेक मोठ्या प्रॉडक्शन हाऊसेस आणि चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींच्या जागांची चौकशी सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात रकुल प्रीत सिंग आणि वासू भगनानी यांच्यासह अनेक नावे रडारवर आहेत. अभिनेत्री रकुल प्रीत सिंग ही वासू भगनानी यांचा मुलगा जॅकी भगनानी याची पत्नी आहे. या कारवाईअंतर्गत, अभिनेत्री रकुलप्रीत सिंग, ज्येष्ठ चित्रपट निर्माते वासू भगनानी आणि पॅनोरमा स्टुडिओ यांच्याशी संबंधित सुमारे १२ ठिकाणी शोधमोहीम राबवण्यात आली...
या धाडीद्वारे, चित्रपटांच्या नावाखाली परदेशात पैसे पाठवल्याच्या आरोपांची चौकशी विभाग करत आहे. कर चुकवेगिरी आणि आर्थिक अनियमिततेच्या संशयावरूनही ही कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आहे. या कारवाईमुळे बॉलिवूड इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे. सूत्रांनुसार, चित्रपट चित्रीकरण, परदेशी वितरण आणि निर्मितीच्या नावाखाली परदेशात मोठ्या प्रमाणात पैसे हस्तांतरित केले जात असल्याची माहिती आयकर विभागाला बऱ्याच काळापासून मिळत आहे. या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर करचुकवेगिरी आणि आर्थिक अनियमितता असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. या संदर्भात, मुंबईतील विविध आयकर पथके मुंबईतील अनेक कार्यालये आणि परिसरांमध्ये शोधमोहीम राबवण्यात आली.Rakul Preet Singh Vashu Bhagnani
 




संबंधित मजकूर