कल्याण : शिक्षणतज्ज्ञ डॉ. दिनेश रामनरेश सिंह यांना नवी दिल्ली येथे आयोजित समारंभात ‘भारतीय पद्म भूषण अवॉर्ड’ आणि ‘साहित्य सेवा रत्न सन्मान’ या दोन पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
नवी दिल्ली येथील नॅशनल सायन्स सेंटरमध्ये आयोजित समारंभात बॉलिवूड अभिनेते पृथ्वी वझीर यांच्या हस्ते डॉ. दिनेश सिंह यांना हे दोन्ही सन्मान प्रदान करण्यात आले.
डॉ. दिनेश सिंह हे आर. के. विद्या प्रसार मंडळाचे ट्रस्टी असून मुंबईस्थित अरिहंत अॅकॅडमिक क्लासेसचे संचालक देखील आहेत. दिल्ली येथे मिळालेल्या या दुहेरी सन्मानाबद्दल कल्याणसह शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले.