मुंबई (SIR Gyanesh Kumar Controversy) : एस आय आर (SIR) च्या मुद्द्यावर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणे चुकीचे असून ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देऊ नये. निवडणुका पारदर्शक होण्यासाठी मतदार यादी सुधारणा होणे आवश्यक आहे. निवडणूक आयोग ही संविधानिक स्वतंत्र संस्था आहे. निवडणूक आयुक्तांचा राजीनामा मागणे आणि पारदर्शक मतदारयादीला विरोध करणे हा विरोधकांचा लोकशाही व्यवस्थेलाच विरोध करण्याचा प्रकार आहे अशी भूमिका रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आज व्यक्त केली.
निवडणूक आयुक्तांमध्ये आता कोणताही मतभेद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.त्यामुळे विरोधकांच्या दबावामुळे मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजीनामा द्यायची गरज नाही.असे ना. रामदास आठवले म्हणाले. (SIR Gyanesh Kumar Controversy)
कॉकरोच जनता पार्टी’ नीट पेपर लीकच्या आंदोलनामुळे चर्चेत आली होती. त्यावेळी दबावामुळे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला होता.मात्र आता प्रत्येक वेळी कोणाचा तरी राजीनामा मागणे योग्य नाही. आता ते मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. प्रत्येक वेळी कोणाचा तरी राजीनामा मागणे योग्य नाही. ‘कॉकरोच जनता पार्टी’ने आपले नाव बदलून ‘राजीनामा जनता पार्टी’ असे ठेवावे. असा टोला ना. रामदास आठवले यांनी आज लगावला. (SIR Gyanesh Kumar Controversy)
निवडणूक आयोग निष्पक्षपणे काम करत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य दोन निवडणूक आयुक्तांमध्ये काही मतभेदाची परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र आता निवडणूक आयोगानेचा आमच्यात काही मतभेद नसल्याचे जाहीर केले आहे.लोकशाही साठी पारदर्शक निवडणुका आवश्यक आहेत त्यासाठी मतदार यादी सुधारणा आवश्यक आहेत.जे मतदार मरण पावले आहेत त्यांची नावे मतदार यादीतून काढली पाहिजेत.तसेच एखाद्या छोट्या घरात ४० पेक्षा जास्त मतदार नावे आढळून येत असतील तर त्याची चौकशी झाली पाहिजे.त्यामुळे एस आय आर आवश्यक असून विरोधकांचा विरोध हा एस आय आर नसून लोकशाहीला विरोध करण्याचा प्रकार ठरत आहे असा टोला ना. रामदास आठवले यांनी सर्व विरोधी पक्षांना लगावला आहे.आज सकाळी मुंबईतून पाली जिल्हा रायगड येथे रवाना होताना ना. रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आपले मत मांडले. (SIR Gyanesh Kumar Controversy)