कॉर्पोरेट जगतात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; आघाडीच्या कंपन्यांमध्ये ’पॉश तक्रारींचा टक्का वाढला

    27-Sep-2026   
 
POSH Complaints in Corporate Companies
 
मुंबई (POSH Complaints in Corporate Companies) : भारतातील अग्रगण्य कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये महिला सुरक्षेचा आणि कामाच्या ठिकाणच्या वातावरणाचा मुद्दा पुन्हा एकदा गंभीरतेने समोर आला आहे. देशातील नामांकित निफ्टी ५० कंपन्यांमध्ये लैंगिक छळवणूक विरोधी कायद्यांतर्गत नोंदवल्या गेलेल्या तक्रारींमध्ये ४.६ टक्क्यांची वाढ झाली आहे.नुकत्याच समोर आलेल्या वार्षिक अहवालांच्या विश्लेषणानुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये या आघाडीच्या कंपन्यांमध्ये एकूण १ हजार ३२७ तक्रारी दाखल झाल्या आहेत, मागील आर्थिक वर्षात १ हजार २६९ तक्रारी होत्या.
 
बँकिंग आणि आयटी क्षेत्रात सर्वाधिक तक्रारी अहवालानुसार, टीसीएस, आयसीआयसीआय बँक , इन्फोसिस आणि एचसीएल यांसारख्या मोठ्या कर्मचारी संख्या असलेल्या आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांमध्ये सर्वाधिक तक्रारींची नोंद झाली आहे. मात्र, या कंपन्यांनी बहुतांश तक्रारींचे वेळेत निवारण केल्याचेही स्पष्ट झाले आहे. मोठ्या सूचीबद्ध कंपन्यांमध्ये पारदर्शकता असल्याने ही आकडेवारी समोर येत आहे, परंतु असंघटित क्षेत्र आणि छोट्या कंपन्यांमध्ये अजूनही अशा तक्रारी दाबल्या जात असल्याची चिंता व्यक्त होत आहे. (POSH Complaints in Corporate Companies)
 
या वाढत्या आकडेवारीमुळे कॉर्पोरेट जगतातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असला, तरी तज्ज्ञांच्या मते या आकड्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. त्यांच्या मते, तक्रारींच्या संख्येत झालेली वाढ म्हणजे कामाच्या ठिकाणी लैंगिक छळवणुकीच्या घटना वाढल्या आहेत असा होत नाही. याउलट, ही वाढ खालील प्रमुख कारणांमुळे झाली आहे: (POSH Complaints in Corporate Companies)
 
१. महिला कर्मचार्‍यांमधील वाढती जनजागृती: कंपन्यांकडून सातत्याने घेतलेल्या जाणार्‍या अनिवार्य प्रशिक्षण सत्रामुळे महिला कर्मचार्‍यांना त्यांच्या हक्कांची आणि ’पॉश’ कायद्याची सखोल माहिती झाली आहे.
 
२. अंतर्गत समितीवरील वाढता विश्वास: कंपन्यांमधील अंतर्गत तक्रार निवारण यंत्रणा आता अधिक पारदर्शक आणि सुरक्षित पद्धतीने काम करत आहे. तक्रार केल्यानंतर नोकरी जाण्याची भीती किंवा सामाजिक बदनामी होण्याऐवेजी आपल्याला न्याय मिळेल, असा विश्वास महिला कर्मचार्‍यांमध्ये निर्माण होत आहे ३. डिजिटल छळवणुकीचे वाढते प्रमाण: पारंपरिक स्वरूपाच्या छळवणुकीसोबतच आता व्हॉट्सअ‍ॅप मेसेज, ईमेल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून होणार्‍या डिजिटल छळवणुकीच्या तक्रारी नोंदवण्याचे प्रमाणही लक्षणीय वाढले आहे. (POSH Complaints in Corporate Companies)
 
 




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर