कल्याण (Nirmalya Collection Drive) : डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे जमा करण्यात आलेल्या निर्माल्यातून ४.५ टनांहून अधिक पाकळ्यांचे संकलन करण्यात आले. तसेच १३.५ टन ओले निर्माल्य नदी आणि नाल्यामध्ये जाण्यापासून वाचवण्यात आले. संकलन केलेल्या पाकळ्या उंबार्ली येथे नेऊन गांडूळ खत तयार केले जाते आणि ते प्रतिष्ठानतर्फे लावलेल्या ५,८०० हून अधिक वृक्षांना पुरविले जाते. (Nirmalya Collection Drive)
गणेशोत्सवाच्या विसर्जनावेळी निर्माण होणारी गर्दी आणि त्यातून जमा होणाऱ्या निर्माल्याच्या व्यवस्थापनाचे आव्हान लक्षात घेऊन, दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे महाराष्ट्र भूषण पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक निर्माल्य संकलन व खतनिर्मिती प्रकल्प राबविण्यात आला. (Nirmalya Collection Drive)
या उपक्रमात सुमारे २,५०० हूनअधिक श्री सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. डोंबिवली पूर्व-पश्चिम, ठाकुर्ली तसेच ग्रामीण विभागातील एकूण २० हून अधिक विसर्जन स्थळांवर शिस्तबद्ध आणि प्रभावीपणे पार पडला. श्री सदस्यांनी संकलित केलेल्या निर्माल्यातील अनावश्यक वस्तू वेगळ्या करून फुलांच्या पाकळ्या स्वतंत्रपणे जमा केल्या. यामधून ४.५ टनांहून अधिक पाकळ्यांचे संकलन करण्यात आले. (Nirmalya Collection Drive)
या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून समाजातील मान्यवर, वरिष्ठ पोलिस अधिकारी तसेच केडीएमसीचे अधिकारी यांनी प्रकल्पाचे कौतुक केले. या उपक्रमामुळे पर्यावरण रक्षणासोबतच समाजात शिस्त, जबाबदारी आणि सामूहिक कार्यसंस्कृतीचा आदर्श निर्माण झाला आहे. (Nirmalya Collection Drive)