मोटर वाहन विभाग कर्मचारी सहकारी पतसंस्थेची 66वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न

“सहकारातून समृद्धीकडे” या ध्येयाने संस्थेची पुढील वाटचाल सुरू ठेवण्याचा संकल्प सभेत करण्यात आला.

    27-Sep-2026
         
 Motor Vehicle Department Credit Society
 
मुंबई : मोटर वाहन विभाग कर्मचारी सहकारी पतसंस्थेची 66वी वार्षिक सभा दि. २६ सप्टेंबर २०२६ रोजी संपन्न झाली.यामध्ये संस्थेच्या आगामी काळातील डिजिटल सेवा, आर्थिक शिस्त, कर्ज सुविधा आणि बचत योजनांच्या माध्यमातून पतसंस्थेला अधिक सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. (Motor Vehicle Department Credit Society)
 
सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष दिनेश वल्लेपवाड होते. या वार्षिक सभेत संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेण्यात आला तसेच चालू आर्थिक वर्षात संस्थेच्या इतिहासात प्रथमच 10 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती देण्यात आली. सभासदांसाठी 10 टक्के लाभांश मंजूर करण्यात आला असून वैयक्तिक सभासदांच्या भागभांडवलाची मर्यादा 2 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्यात आली आहे. सभासदांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन ओव्हरड्राफ्ट कर्जाची मर्यादाही वाढविण्यात आली आहे. संस्थेच्या आर्थिक कामकाजातील या महत्त्वपूर्ण टप्प्याबद्दल सभासदांनी समाधान व्यक्त केले. (Motor Vehicle Department Credit Society)
 
संस्थेच्या कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याच्या दृष्टीने Web-Based Application सुरू करण्यात आले. या सुविधेमुळे सभासदांना मोबाईलवरून आपल्या खात्याची, कर्जाची माहिती तसेच इतर आर्थिक व्यवहारांची माहिती सहज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे संस्थेचे कामकाजात अधिक पारदर्शक आणि सुलभ होणार आहे. सभासदांच्या बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी Recurring Deposit (RD) खाते सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, लवकरच ही सुविधा सभासदांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. (Motor Vehicle Department Credit Society)
 
संस्थेचा निधी सुरक्षित राहण्यासाठी आणि थकबाकी नियंत्रित ठेवण्यासाठी स्वतंत्र वसुली अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.दरम्यान, अनेक सभासद एकाच वेळी कर्जासाठी अर्ज करीत असल्याने संस्थेच्या उपलब्ध निधीवर येणारा ताण लक्षात घेऊन संस्थेच्या वतीने लोखंडे साहेब, कर्मचारी शैलेश नारकर आणि अध्यक्ष दिनेश वल्लेपवाड यांनी मुंबई बँकेचे उपाध्यक्ष तथा माजी आमदार शिवाजीराव नलावडे यांची भेट घेतली होती. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळून संस्थेला Cash Credit सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे पात्र सभासदांना त्यांच्या गरजेच्या वेळी कर्ज सुविधा उपलब्ध करून देणे अधिक सुलभ होणार आहे. (Motor Vehicle Department Credit Society)
 
या वार्षिक सभेत संस्थेच्या प्रगतीमध्ये योगदान देणाऱ्या सर्व सभासदांचे, संचालक मंडळाचे आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच सेवानिवृत्त झालेल्या सभासदांचा आणि विविध परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. (Motor Vehicle Department Credit Society)
 
यावेळी संस्थेच्या वाटचालीचा उल्लेख करताना अध्यक्ष दिनेश वल्लेपवाड यांनी सांगितले की, “आपली पतसंस्था अनेक वर्षांपूर्वी एका छोट्याशा रोपट्याप्रमाणे सुरू झाली. अनेक पिढ्यांनी या रोपट्याला जपले, वाढवले आणि आज त्याचे मोठ्या वृक्षात रूपांतर झाले आहे. हा वृक्ष आणखी मोठा आणि मजबूत करण्याची जबाबदारी आता आपल्या सर्वांची आहे.”
“ही पतसंस्था कोणत्याही एका व्यक्तीची नसून प्रत्येक कर्मचारी सभासदाची आहे. सभासदांचा विश्वास हीच संस्थेची ताकद असून, पारदर्शक व्यवहार, आर्थिक शिस्त आणि उत्तम सभासद सेवा यांना प्राधान्य देऊन संस्थेची पुढील वाटचाल सुरू राहील,” असेही अध्यक्षांनी यावेळी सांगितले. (Motor Vehicle Department Credit Society)
 
— मोटर वाहन विभाग कर्मचारी सहकारी पतसंस्था, मुंबई
 
 




संबंधित मजकूर