मेक इन इंडिया’चा डंका! भारत जगात मोबाईल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये दुसर्‍या क्रमांकाचा देश !

    27-Sep-2026   
 
Make in India Mobile Manufacturing
 
नवी दिल्ली (Make in India Mobile Manufacturing) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी आणि दूरगामी ’मेक इन इंडिया’ मोहिमेला दि. २५ सप्टेंबर रोजी यशस्वीरित्या १२ वर्षे पूर्ण झाली असून, या कालावधीत भारताने जागतिक उत्पादन क्षेत्रात मजबूत ओळख निर्माण केली आहे. दि. २६ सप्टेंबर रोजी केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांकडून या मोहिमेच्या यशस्वितेचा आढावा घेताना देशातील वाढत्या रोजगाराची आणि विक्रमी निर्यातीची सकारात्मक आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.
 
गेल्या १२ वर्षांत केंद्र सरकारच्या सातत्यपूर्ण धोरणांमुळे, विशेषतः ’प्रॉडक्शन लिंक्ड इन्शेंटिव्ह’ योजनेमुळे, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, संरक्षण आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांनी भारतात आपले उत्पादन प्रकल्प सुरू केले आहेत. भारत आज जगात मोबाईल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा देश बनला आहे. तसेच देशातील ९६ टक्के युपीआय व्यव्हार हे २ हजार रुपयांपेक्षा कमी रकमेचे आहेत. हे आकडे सिद्ध करतात की देशातील भाजी विक्रेते, छोटे दुकानदार आणि सामान्य नागरिक डिजिटल अर्थव्यवस्थेचे मुख्य आधारस्तंभ बनले आहेत. (Make in India Mobile Manufacturing)

’मेक इन इंडिया’ मुळे तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार
 
केंद्र सरकारने देशांतर्गत उत्पादनाला चालना दिल्यामुळे केवळ शहरांमध्येच नव्हे, तर निमशहरी आणि ग्रामीण भागातील लाखो तरुणांना थेट व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील नवीन कारखान्यांमुळे तंत्रकुशल तरुणांना देशातच उच्च पगाराच्या नोकर्‍या मिळत आहेत. आयआयटी दिल्लीची ’ग्राफिक्स चिप’पंतप्रधानांच्या ’आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेला बळ देत आयआयटी दिल्लीच्या संशोधकांनी कमी किमतीच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी देशातील पहिली स्वदेशी ’ग्राफिक्स चिप’ विकसित केली आहे. यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचे परकीय देशांवरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. (Make in India Mobile Manufacturing)
 
 




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर