टाटा कार्सकडून ऑल-न्यू टाटा एरिस लाँच! भारतीय ग्राहकांसाठी कॉम्पॅक्ट सेदानचा नवा पर्याय

    27-Sep-2026
 
 Tata Aeris Sedan 2026
 
मुंबई (Tata Aeris Sedan 2026) : टाटा कार्सने ऑल-न्यू टाटा एरिस या कॉम्पॅक्ट सेदानचे लाँच करण्याची घोषणा केली आहे. विशेषतः वैयक्तिक कार खरेदीदारांच्या गरजा लक्षात घेऊन या कारची निर्मिती करण्यात आली आहे. आरामदायीपणा, प्रशस्त जागा, स्थिरता, कार्यक्षमता आणि आकर्षक डिझाइन यांचा आधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षेसोबत मेळ घालण्याचा प्रयत्न एरिसमध्ये करण्यात आला आहे.
 
ऑल-न्यू एरिस पेट्रोल आणि सीएनजी पॉवरट्रेन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. पेट्रोल व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत ५.२९ लाख रुपये, तर आयसीएनजी व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत ६.२९ लाख रुपये आहे. या सर्व किंमती एक्स-शोरूम दिल्ली आहेत. (Tata Aeris Sedan 2026)
 
पेट्रोल मॅन्युअल (MT) ट्रान्समिशनमध्ये एरिसच्या ‘स्मार्ट’ ट्रिमची किंमत ५.२९ लाख रुपयांपासून सुरू होते. ‘प्युअर’ची किंमत ६.१४ लाख, ‘प्युअर+’ची ६.७४ लाख, ‘क्रिएटिव्ह’ची ७.४९ लाख, तर टॉप-स्पेक ‘अकम्प्लिश्ड’ ट्रिमची किंमत ८.१९ लाख रुपये आहे.
 
ऑटोमॅटिक ट्रान्समिशनची निवड करणाऱ्या ग्राहकांसाठी पेट्रोल एएमटी (AMT) पर्याय ‘प्युअर’ ट्रिमपासून उपलब्ध आहे. त्याची किंमत ६.६९ लाख रुपये आहे. ‘प्युअर+’ची किंमत ७.२९ लाख, ‘क्रिएटिव्ह’ची ८.०४ लाख आणि ‘अकम्प्लिश्ड’ व्हेरिएंटची किंमत ८.७४ लाख रुपये आहे. (Tata Aeris Sedan 2026)
 
एरिसच्या माध्यमातून टाटा कार्सने कॉम्पॅक्ट सेदानच्या पारंपरिक वापराकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मांडला आहे. आतापर्यंत या श्रेणीत फ्लीट आणि वैयक्तिक ग्राहकांच्या गरजा एकाच उत्पादनातून पूर्ण करण्यावर भर दिला जात होता. मात्र, एरिसची रचना प्रामुख्याने वैयक्तिक ग्राहकांच्या गरजा, आवडीनिवडी आणि महत्त्वाकांक्षा लक्षात घेऊन करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे.
डिझाइन, तंत्रज्ञान, सुरक्षा, आराम आणि ड्रायव्हिंग अनुभव यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न या कारमध्ये करण्यात आला आहे. (Tata Aeris Sedan 2026)
 
टाटा एरिसच्या लाँचप्रसंगी टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ शैलेश चंद्रा म्हणाले, “सेदान कारची कालातीत अभिव्यक्ती राहिली आहे. सेदानचे निष्ठावान ग्राहक आरामदायीपणा, प्रशस्त जागा, ड्रायव्हिंग डायनॅमिक्स आणि व्यावहारिकता यांच्या अनोख्या संगमाला प्राधान्य देतात.” (Tata Aeris Sedan 2026)
 
ते पुढे म्हणाले, “एरिसच्या माध्यमातून विविध बॉडी स्टाइल्स आणि पॉवरट्रेन पर्यायांमध्ये अर्थपूर्ण पर्याय उपलब्ध करून देण्याचे टाटा कार्सचे तत्त्व प्रत्यक्षात आणत आहोत. ग्राहकांसाठी स्टायलिश नवीन सेदान सादर करण्यात आली असून, आपल्या कारकडे प्रगती, यश आणि व्यक्तिमत्त्वाचे प्रतीक म्हणून पाहणाऱ्या ग्राहकांच्या गरजा लक्षात घेण्यात आल्या आहेत.”
 
डिझाइन आणि इंजिनिअरिंगपासून तंत्रज्ञान, सुरक्षा आणि ड्रायव्हिंग अनुभवापर्यंत प्रत्येक निर्णयात ग्राहकाला केंद्रस्थानी ठेवून एरिसची निर्मिती करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. (Tata Aeris Sedan 2026)
 




संबंधित मजकूर