मुंबई (Galaxy Watch Health Technology India) : सॅमसंगच्या भारतातील प्रगत संशोधन केंद्र असलेल्या ‘सॅमसंग रिसर्च इन्स्टिट्यूट-नोएडा’ (एसआरआई-एन) येथील अभियंते गॅलेक्सी वॉच ९ आणि गॅलेक्सी वॉच अल्ट्रा २ मधील आरोग्य आणि फिटनेसविषयक वैशिष्ट्ये अधिक प्रगत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. जागतिक स्तरावरील सॉफ्टवेअर विकसित करण्यासोबतच भारतातील रस्ते, हवामान आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन या वेअरेबल उपकरणांची प्रत्यक्ष चाचणीही या अभियंत्यांकडून केली जात आहे.
याशिवाय, एसआरआई-एनकडून सॅमसंग हेल्थ ॲपला भारत सरकारच्या आयुष्मान भारत डिजिटल मिशनशी जोडण्यात आले आहे. त्यामुळे देशातील डिजिटल आरोग्य परिसंस्थेला बळकटी देण्याच्या दिशेनेही या केंद्राचे काम सुरू आहे. (Galaxy Watch Health Technology India)
सॅमसंग रिसर्च इन्स्टिट्यूट-नोएडाचे मॅनेजिंग डायरेक्टर क्यूंगयुन रू म्हणाले, “स्मार्टवॉचशी संबंधित वैशिष्ट्यांसह डिजिटल आरोग्य हे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र आहे. गेल्या तीन ते चार वर्षांत आम्ही विशेषतः भारतासाठी अनेक नवीन सेवा सुरू केल्या आहेत. भारतातील अपवादात्मक गुणवत्तेचा आम्हाला पूर्ण आदर असून, सॅमसंग हेल्थ आणि एआय क्षेत्रात या टॅलेंटचा पुरेपूर वापर करण्याचे आमचे ध्येय आहे.”
२००७ मध्ये स्थापन झालेल्या एसआरआई-एन चे सॅमसंगच्या जागतिक आरॲंडडी टीम्ससोबत सातत्याने काम सुरू आहे. गॅलेक्सी वॉच ९ आणि गॅलेक्सी वॉच अल्ट्रा २ मधील ‘व्हायटल ट्रॅकर’, ‘डेली कार्डिओ लोड’, ‘हिअरिंग हेल्थ’ आणि ‘ट्रेल रनिंग’ यांसारख्या प्रमुख वैशिष्ट्यांच्या विकासात नोएडा केंद्राचा महत्त्वाचा वाटा आहे. (Galaxy Watch Health Technology India)
‘व्हायटल ट्रॅकर’ हे फीचर वापरकर्त्याच्या झोपेच्या वेळी हृदयाचे ठोके, हृदयाच्या ठोक्यांमधील बदल, त्वचेचे तापमान, श्वासोच्छवासाचा वेग आणि रक्तातील ऑक्सिजन यांसारख्या बाबींचे मापन करते. या आकडेवारीत सामान्य मर्यादेपेक्षा बदल आढळल्यास, सिस्टीम संभाव्य कारणांची माहिती देऊन आवश्यक सल्लाही देते.
दुसरीकडे, ‘डेली कार्डिओ लोड’ हे फीचर वापरकर्त्याच्या हालचाली, झोप आणि विश्रांतीची माहिती एकत्रित करून व्यायामाच्या तीव्रतेचा अधिक अचूक अंदाज घेण्यास मदत करते. (Galaxy Watch Health Technology India)
एसआरआई-एनच्या सर्व्हिस डेव्हलपमेंट विभागाचे उपाध्यक्ष डॉ. अमिताभ थपलियाल म्हणाले, “आमचा प्लॅटफॉर्म वेअरेबल उपकरणांमधील माहिती स्मार्टफोनशी जोडतो आणि शारीरिक व्यायाम, झोप, आहार, मानसिक शांतता तसेच आरोग्याच्या महत्त्वाच्या लक्षणांवर लक्ष ठेवण्यास मदत करतो. भारतातील आमच्या अभियंत्यांनी सेन्सर तंत्रज्ञानामध्ये सुधारणा केली असून, या सुधारणा जागतिक पातळीवरील उत्पादनांमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत.”
एसआरआई-एन ची भूमिका केवळ सॉफ्टवेअर विकसित करण्यापुरती मर्यादित नाही. स्थानिक परिस्थितीत प्रत्यक्ष चाचण्या घेऊन सिस्टीम अधिक अचूक करणे हेदेखील या केंद्राच्या कामाचा महत्त्वाचा भाग आहे. (Galaxy Watch Health Technology India)
उदाहरणार्थ, सुरुवातीच्या चाचण्यांदरम्यान भारतातील खडबडीत रस्त्यांवरून धावणाऱ्या ऑटो-रिक्षांच्या हालचालींना सिस्टीम सायकल चालवणे म्हणून ओळखत होती. भारतीय अभियंत्यांनी या चुकीच्या नोंदींचा अभ्यास करून अल्गोरिदममध्ये सुधारणा केली. त्यामुळे सेन्सर्सची अचूकता सुधारण्यास मदत झाली.
एसआरआई-एन ने सॅमसंग हेल्थ ॲपच्या माध्यमातून भारतासाठी विशेष कनेक्टेड डिजिटल आरोग्य रचना विकसित केली आहे. याअंतर्गत इका केअरच्या सहकार्याने आयुष्मान भारत डिजिटल मिशनचे एकीकरण करण्यात आले आहे. (Galaxy Watch Health Technology India)
यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या आरोग्य नोंदी आयुष्मान भारत हेल्थ अकाउंटमध्ये सुरक्षित ठेवता येतात आणि गरजेनुसार त्या डॉक्टरांसोबत शेअर करणेही शक्य होते.
याशिवाय, टाटा १एमजी आणि फार्मईझी यांच्या सहयोगाने उपलब्ध करण्यात आलेल्या ‘फाइंड केअर’ सेवेद्वारे ॲपमध्येच डॉक्टरांचा सल्ला घेणे, औषधे मागवणे आणि लॅब चाचण्या बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. (Galaxy Watch Health Technology India)
एआयवर आधारित ‘स्मार्ट मेडिकेशन मॅनेजमेंट’ डिजिटल प्रिस्क्रिप्शनमधून औषधांची माहिती घेऊन ती ट्रॅकरमध्ये समाविष्ट करते. औषधे घेण्याच्या वेळेचे अलर्ट थेट गॅलेक्सी वॉचवरही मिळतात.
या उपक्रमांमधून भारतातील एसआरआई-एन केंद्राची भूमिका केवळ सॅमसंगच्या जागतिक उत्पादनांमध्ये तांत्रिक सुधारणा करण्यापुरती मर्यादित नसून, डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारतीय वापरकर्त्यांसाठी आरोग्य व्यवस्थापन अधिक सुलभ करण्याच्या दिशेनेही असल्याचे दिसून येते. (Galaxy Watch Health Technology India)