माणदेशात रोहित पक्ष्यांची वाढती हजेरी; ‘या’ तलावावर ३० ग्रेटर फ्लेमिंगोचा थवा

    26-Sep-2026
mandesh conservation project


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
दुष्काळी माणदेशातील पाणथळी आता स्थलांतरित पक्ष्यांसाठी महत्त्वाच्या ठरत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे (mandesh conservation project). म्हसवडजवळील राजेवाडी तलावावर तब्बल ३० ग्रेटर फ्लेमिंगो (Greater Flamingo) आढळून आले आहेत. २१ सप्टेंबर २०२६ रोजी पक्षीतज्ज्ञ डॉ. प्रवीण चव्हाण (वडूज, खटाव) आणि ‘माणदेश संवर्धन प्रकल्पा’च्या सदस्यांनी या पक्ष्यांची नोंद केली (mandesh conservation project). विशेष म्हणजे, याच वर्षी ऑगस्टमध्ये याच तलावावर पाच प्रौढ ग्रेटर फ्लेमिंगोंची नोंद झाली होती (mandesh conservation project). त्यामुळे अवघ्या सव्वा महिन्यात संख्या पाचवरून ३०पर्यंत पोहोचल्याने राजेवाडी तलावाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. (mandesh conservation project)
 
 
 
माण-खटाव परिसरातील ग्रेटर फ्लेमिंगोंच्या नोंदी साधारणपणे हिवाळ्यातील स्थलांतराशी जोडल्या जात होत्या. मात्र, १२ ऑगस्ट २०२६ रोजी राजेवाडी धरणावर पाच प्रौढ फ्लेमिंगोंची नोंद झाली होती. त्या वेळी पावसाळ्यात या पक्ष्यांची उपस्थिती असणे हे अभ्यासकांसाठी विशेष ठरले होते. आता सप्टेंबरच्या उत्तरार्धात त्याच ठिकाणी ३० पक्षी आढळल्याने हा केवळ एखाद-दोन पक्ष्यांचा अपवादात्मक मुक्काम नसून राजेवाडी तलावाने या वर्षी फ्लेमिंगोंसाठी अनुकूल अधिवासाचे स्वरूप धारण केले असावे, असा कयास बांधता येतो.
 
 
 
ग्रेटर फ्लेमिंगो हा प्रामुख्याने उथळ पाण्यात खाद्य शोधणारा फिल्टर-फीडिंग पक्षी आहे. त्याचे खाद्य प्रामुख्याने सूक्ष्म शैवाल, लहान जलचर अपृष्ठवंशी आणि इतर सूक्ष्म जलजीवांवर अवलंबून असते. यंदाच्या पावसामुळे राजेवाडी तलावात निर्माण झालेली उथळ पाण्याची क्षेत्रे, चिखलयुक्त काठ आणि त्यात निर्माण झालेली सूक्ष्मजीवसंपदा फ्लेमिंगोंना आकर्षित करणारी ठरली असण्याची शक्यता आहे. माणदेशातील फ्लेमिंगोंचा इतिहास काही दशकांपर्यंत मागे जातो. १९९१-९२ मध्ये पिंगळी तलावावर फ्लेमिंगो आणि इतर पाणपक्ष्यांच्या नोंदी पक्षी अभ्यासक डॉ. विनोद भागवत आणि शरद आपटे यांनी केल्या होत्या. त्यानंतर माण-खटाव पक्षी सर्वेक्षणाच्या माध्यमातून सुमारे ३० वर्षांनी पुन्हा फ्लेमिंगोंच्या नोंदी झाल्या. माणदेशातील येरळवाडी, सूर्याचीवाडी, पेडगाव, पिंगळी, देवापूर, राजेवाडी, मायणी आदी पाणथळी स्थलांतरित पक्ष्यांच्या भ्रमणमार्गाचा भाग असल्याचे पूर्वीच्या पक्षी अभ्यासातून नमूद झाले आहे.




संबंधित मजकूर