मुंबई : भारताच्या इक्विटी बाजाराच्या वाढीच्या प्रवासातील महत्त्वाचा निर्देशांक ठरलेल्या GIFT Nifty ने आणखी एक विक्रम नोंदवला आहे. दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी GIFT Niftyमध्ये एका दिवसातील सर्वाधिक ४ लाख ५७ हजार ९९९ करारांचा (Contracts) व्यवहार झाला. या व्यवहाराची उलाढाल २१.१८ अब्ज अमेरिकी डॉलर इतकी होती.(GIFT Nifty Record)
याच दिवशी GIFT Niftyने ओपन इंटरेस्टमध्येही (Open Interest) सर्वकालीन उच्चांक गाठला. ओपन इंटरेस्ट ४ लाख ५२ हजार ४३३ करारांवर पोहोचले असून, त्याची उलाढाल २०.९३ अब्ज अमेरिकी डॉलर इतकी नोंदवण्यात आली.(GIFT Nifty Record)
३ वर्षांत ७५.६८ दशलक्षांहून अधिक करार
दि. ३ जुलै २०२३ रोजी GIFT Niftyचे पूर्ण क्षमतेने कामकाज सुरू झाल्यापासून NSE IX वरील व्यवहारांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. दि. २४ सप्टेंबर २०२६ पर्यंत GIFT Niftyमध्ये एकूण ७५.६८ दशलक्षांहून अधिक करारांचा व्यवहार झाला आहे. या कालावधीत एकूण व्यवहारमूल्य ३.५० ट्रिलियन अमेरिकी डॉलर पेक्षा अधिक झाले आहे.(GIFT Nifty Record)
या कामगिरीबद्दल NSE IXने सर्व बाजार सहभागींचे आभार मानले असून, त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे GIFT Niftyच्या यशाला मोठी चालना मिळाल्याचे म्हटले आहे.(GIFT Nifty Record)
NSE IX म्हणजे काय?
NSE IX (NSE International Exchange) ही GIFT City येथे ५ जून २०१७ रोजी स्थापन झालेली आंतरराष्ट्रीय बहुआस्ति एक्स्चेंज आहे. ती International Financial Services Centres Authority (IFSCA)च्या मान्यतेखाली कार्यरत आहे.(GIFT Nifty Record)
NSE IX वर भारतीय कंपन्यांचे सिंगल स्टॉक डेरिव्हेटिव्ह्ज, इंडेक्स डेरिव्हेटिव्ह्ज, चलन डेरिव्हेटिव्ह्ज, डिपॉझिटरी रिसीट्स आणि ग्लोबल स्टॉक्स यांसह विविध वित्तीय उत्पादने उपलब्ध आहेत. याशिवाय इक्विटी शेअर्स, SPAC, REITs, InvITs, डिपॉझिटरी रिसीट्स, डेट सिक्युरिटीज आणि ESG डेट सिक्युरिटीजच्या लिस्टिंगसाठीही सुविधा उपलब्ध आहेत.(GIFT Nifty Record)
GIFT Nifty आणि NSE IX यांना अमेरिकेतील CFTC आणि SECकडून संबंधित नियामक सवलती मिळाल्याने अमेरिकेतील ग्राहकांनाही NSE IX वर सूचीबद्ध डेरिव्हेटिव्ह करारांमध्ये सहभागी होता येते. (GIFT Nifty Record)