
मुंबई - Ranbir Kapoor Alia Bhattसंजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘लव्ह अँड वॉर’ हा सध्या प्रेक्षकांकडून सर्वाधिक प्रतीक्षा असलेल्या आणि बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात इंडस्ट्रीतील तीन आघाडीचे आणि प्रतिभावान कलाकार रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. या दमदार कलाकारांच्या साथीने भन्साळी प्रेक्षकांसाठी एक भव्य आणि अविस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव घेऊन येत आहेत.
चित्रपटाशी संबंधित प्रत्येक अपडेटची आतुरतेने वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी आता निर्मात्यांनी चित्रपटाची बहुप्रतीक्षित पहिली झलक सादर केली आहे. होय, ‘लव्ह अँड वॉर’मधील रणबीर कपूरचा फर्स्ट लुक पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे.Ranbir Kapoor Alia Bhatt
या फर्स्ट लुक पोस्टरमध्ये रणबीर कपूर अत्यंत प्रभावी दिसत असून, एका पूर्णपणे वेगळ्या आणि अनोख्या व्यक्तिरेखेत ते पूर्णपणे रंगलेले पाहायला मिळत आहेत. भन्साळी यांच्या प्रत्येक प्रोजेक्टप्रमाणेच या चित्रपटातही भव्यता आणि प्रत्येक बारीकसारीक तपशीलावर विशेष लक्ष देण्यात आले आहे, याची झलक या पोस्टरमधून पाहायला मिळते. पोस्टरवरूनच हा चित्रपट मोठ्या पडद्यावर आपली जादू निर्माण करणार असल्याचे स्पष्ट होते.Ranbir Kapoor Alia Bhatt
रणबीर कपूर यांना अशा अवतारात यापूर्वी कधीही पाहण्यात आलेले नाही. ‘लव्ह अँड वॉर’मध्ये त्यांचा असा लूक पाहायला मिळेल, अशी प्रेक्षकांनीही अपेक्षा केली नव्हती.Ranbir Kapoor Alia Bhatt
निर्मात्यांनी सोशल मीडियावर पोस्टर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे , SLB यांना रुपेरी पडद्यावर प्रेम आणि रोमान्स साकारताना पाहणे ही नेहमीच एक पर्वणी असते. अशातच ‘लव्ह अँड वॉर’च्या माध्यमातून प्रेक्षकांना पुन्हा एकदा प्रेमाचा जादुई अनुभव घेता येणार आहे. त्यामुळे या फर्स्ट लुकने चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता आणखी एका वेगळ्या पातळीवर नेली आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.Ranbir Kapoor Alia Bhatt
संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’मध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. हा चित्रपट २१ जानेवारी २०२७ रोजी हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.Ranbir Kapoor Alia Bhatt