ज्येष्ठ अभिनेता मुश्ताक खान यांचे निधन !

    24-Sep-2026
 
 
mushtaq
 
 
मुंबई - Mushtaq Khanप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान यांचे वयाच्या ५६व्या वर्षी निधन झाले आहे. ते अनेक दिवसांपासून कर्करोगाने त्रस्त होते. ‘वेलकम’, ‘गदर’, ‘आशिकी’, ‘मुझसे शादी करोगी’ आणि ‘हम हैं राही प्यार के’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
मुश्ताक खान गेल्या १५ दिवसांपासून मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल होते. ते कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांना सुमारे पाच वर्षांपूर्वी कर्करोगाचे निदान झाले होते, पण अलीकडेच, तो आजार पुन्हा बळावला. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावतच गेली.Mushtaq Khan
मुश्ताक खान यांनी चित्रपट आणि मालिकांमध्ये प्रामुख्याने सहाय्यक आणि विनोदी भूमिकांमधून आपली ओळख निर्माण केली. 'वेलकम'मधील त्याचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला होता.याशिवाय 'आशिकी', 'मुझसे शादी करोगी' आणि 'हम हैं राही प्यार के' यांसारख्या चित्रपटांमध्येही त्याने आपल्या अभिनयाची छाप सोडली.Mushtaq Khan
त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील बैहर गावात एका मुस्लिम कुटुंबात झाला. अक्षय कुमार, नाना पाटेकर, अनिल कपूर आणि परेश रावल यांच्यासोबत काम केलेल्या २००७ सालच्या 'वेलकम' या विनोदी चित्रपटातील 'बल्लू' या भूमिकेसाठी त्यांना विशेषतः ओळखले जाते.Mushtaq Khan
हेरा फेरी, हम हैं राही प्यार के, जोडी नंबर 1, आणि वॉन्टेड यासह इतर अनेक चित्रपटांमध्ये त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. कुछ रंग प्यार के ऐसे भी, भारत एक खोज, वागळे की दुनिया, नुक्कड आणि इतर मालिकांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. त्यांच्या निधनाने भारतीय मनोरंजन क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.Mushtaq Khan
 




संबंधित मजकूर